हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. चालकाच्या हलगर्जीमुळे किंवा वाहनातील बिगाड अथवा खराब टायर्समुळे हे अपघात घडत असल्याची माहिती समोर येत आहे. सततच्या अपघातांमुळे समृद्धी महामार्गाचे नाव बदनाम झालं आहे. यावर उपाय म्हणून आता समृद्धी महामार्गावर खराब टायर असलेल्या वाहनांना प्रवेश नाकारण्यात येतोय. यासाठी RTO ची 8 पथके तैनात करण्यात आली आहेत.
3 महिन्यात 1000 गाड्या परत पाठवल्या –
एका रिपोर्टनुसार राज्य सरकार समृद्धी एक्सप्रेस वे (Samruddhi Mahamarg) वर ट्राफिक नियमांचे पालन न केल्यामुळे आणि खराब टायर असलेल्या वाहनांवर कडक निर्बंध लावले आहेत. निर्बंध आरटीओ नियमानुसार असून सरकार वाहनांची फिटनेस तपासणी करत आहे. यामध्ये कारच्या टायरची तपासणी केली जाते. यावेळी टायर कॉलिटी चे आणि फाटलेले असेल तर त्यांना हायवेवर एन्ट्री दिली जात नाही आणि अशा गाड्या परत माघारी पाठवल्या जात आहेत. मागील तीन महिन्यात 1000 गाड्यांना या कारणामुळे परत पाठवण्यात आले आहे.
महाराष्ट्र रस्ता सुरक्षा कक्षाने दिलेल्या आकडेवारीनुसार, 8 आरटीओ कार्यालयातील पथकाने आतापर्यंत 21000 वाहनांची तपासणी केली. त्याचबरोबर 234 गाड्या जास्त स्पीडने कार चालवताना आढळले. 234 पैकी 77 गाड्या हायवे वर बसवण्यात आलेल्या संगणकीकृत गती प्रणाली द्वारे पकडण्यात आल्या. त्याचबरोबर कार दुरुस्त नसल्यास किंवा खराब टायर वापरल्यास चलन देखील कापण्यात आले.
120 किमी प्रति तास वेग मर्यादा- (Samruddhi Mahamarg)
याबाबत रस्ता सुरक्षा उपायुक्त भरत काळसकर म्हणाले की, ही कारवाई संगणकृत प्रणाली वापरून करण्यात आली आहे. वाहनांचा वेग वाढल्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण जास्त वाढते. ७०१ किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) मुंबईपासून नागपूरला जोडत असून तो एकूण १० जिल्ह्यातून जात आहे. या महामार्गांवर वाहने हायस्पीड कॉरिडोर वर 120 किमी प्रति तास धावतात. ही वेग मर्यादा जास्त असल्यामुळे वाहने जोरात धावतात. मुळे त्यांच्या टायरची स्थिती चांगली असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर एक्सप्रेस हायवेवर नो पार्किंग मध्ये वाहने पार्क केल्याबद्दल आतापर्यंत 3169 वाहनधारकांना आणि नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 2244 वाहनांना दंड ठोकण्यात आलेला आहे. त्याचबरोबर 1043 वाहनांवर रिप्लेटिव्ह टेप नसल्यामुळे कारवाई करण्यात आली.