Samruddhi Mahamarg To Vadhavan Port : समृद्धी महामार्गाचा विस्तार होणार; थेट ‘या’ बंदरापर्यंत पोचणार

Samruddhi Mahamarg To Vadhavan Port
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Samruddhi Mahamarg To Vadhavan Port। मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे उदघाटन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एक मोठी घोषणा केली. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा विस्तार करण्यात येणार असून आता हा महामार्ग थेट वाढवण बंदराशी जोडला जाईल अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यामुळे राज्याला एक नवीन महामार्ग मिळणार आहे. या नव्या महामार्गामुळे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील 24 जिल्हे पालघरमधील वाढवण बंदराशी जोडले जातील. त्यामुळे विकासही झपाट्याने विकास होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

इगतपूरी ते वाढवण 123.4 किमीचा नवा मार्ग- Samruddhi Mahamarg To Vadhavan Port

काल इगतपुरी ते आमणे या समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे उदघाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी त्यांनी पुढच्या नियोजनाबद्दल सांगितलं. समृद्धी महामार्गाचा विस्तार वाढवण बंदरापर्यंत वाढवण्यासाठी इगतपूरी ते वाढवण असा 123.4 किमीचा नवा मार्ग तयार करण्यात येणार आहे. या नव्या मार्गामुळं इगतपुरी पासून अवघ्या २ तासांच्या आता वाढवण बंदरापर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाकडून चारोटी-इगतपुरी द्रुतगती महामार्ग बांधण्यात येणार आहे. लवकरच या महामार्गाचे काम सुरू होणार आहे यामुळे राज्यातील अनेक जिल्हे वाढवण बंदरासोबत कनेक्ट होणार (Samruddhi Mahamarg To Vadhavan Port) आहे. या नव्या महामार्गामुळं विदर्भ, मराठवाड्यातून येणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचा माल थेट बंदरापर्यंत पोहोचवता येणार आहे.

हे पण वाचा : मुंबई- पुणे एक्सप्रेस वे 10 पदरी होणार; काय आहे सरकारचा प्लॅन

दरम्यान, या शेवटच्या टप्प्याच्या उदघाटनानंतर समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) संपूर्णपणे प्रवाशांच्या सेवेत आला आहे. मुंबई आणि नागपूरला जोडणाऱ्या या महामार्गामुळे कनेक्टिव्हिटी चांगलीच वाढली आहे. हा महामार्ग 10 जिल्ह्यांतून (नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे) आणि 390 गावांतून जातो. तसेच तो 24 जिल्ह्यांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे जोडतो, विशेषत: विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने हा महामार्ग महत्वाचा ठरला आहे. 701 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गामुळे मुंबई ते नागपूर हा प्रवास आता ८ तासात पुर्ण होईल. समृद्धी महामार्गावर 50 पेक्षा जास्त उड्डाणपूल, 24+ इंटरचेंज, 30 भुयारी मार्ग, 56 टोल बूथ बसवण्यात आले आहेत.

शक्तीपीठ महामार्गही बनवू- फडणवीस

समृद्धी महामार्ग रेकॉर्डब्रेक वेळेत पूर्ण झाल्यानंतर आता शक्तिपीठ महामार्ग सुद्धा लवकरात लवकर पूर्ण करू असा निर्धार देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला. हा शक्तीपीठ महामार्ग नागपूर ते गोवा असा असून महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यातून जाईल आणि ३ शक्तिपीठांसह अनेक मोठ्या धार्मिक स्थळांना जोडेल. हा महामार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या 12 जिल्ह्यांतून जाईल. महामार्गावर 26 ठिकाणांवर इंटरचेंज असेल. 48 मोठे पूल, 30 बोगदे, आठ रेल्वे क्रॉसिंग असतील. तब्बल 86 हजार कोटी रुपयांचा खर्च करून हा शक्तीपीठ महामार्ग बांधण्यात येईल.