व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

Samsung ने लाँच केले 2 नवे Mobile; पहा किंमत आणि फीचर्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Samsung ने भारतीय बाजारात आपले 2 नवे स्मार्टफोन Samsung Galaxy A34 5G आणि Samsung Galaxy A54 5G लाँच केले आहेत. अतिशय दमदार फीचर्स असलेल्या या दोन्ही मोबाईलची विक्री २८ मार्च पासून सुरु होणार आहे. आज आपण जाणून घेऊया सॅमसंग Galaxy A34 आणि Samsung Galaxy A54 ची खास वैशिष्ठ्ये आणि त्यांच्या किमतीबाबत….

1) Samsung Galaxy A54 5G

Samsung Galaxy A54 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेट सह 6.4-इंचाचा फुल एचडी + पंच-होल डिस्प्ले मिळतो. AMOLED पॅनेलवर ही स्क्रीन तयार केली आहे. या स्मार्टफोनमध्ये Samsung Xnos 1380 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. या मोबाईलला 5,000 mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Samsung Galaxy A54 5G च्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, हा स्मार्टफोन ट्रिपल कॅमेरा सेटअप सह येतो यामध्ये 50-मेगापिक्सलचा प्राथमिक सेन्सर, 12-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड-एंगल लेन्स आणि 5- मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स कॅमेरा मिळतो. याशिवाय विडिओ कॉल आणि सेल्फी साठी 32 मेगापिक्सेल चा फ्रंट कॅमेरा मिळतो. Samsung Galaxy A54 5G २ स्टोरेज व्हेरिएन्टसह येतो. 8GB RAM आणि 128G स्टोरेज असलेल्या मोबाईलची किंमत 38,999 रुपये आहे तर 8GB RAM आणि 256GB स्टोरेज व्हेरिएन्टची किंमत 40,999 रुपये आहे.

2) Samsung Galaxy A34 5G

Samsung Galaxy A34 5G मध्ये 6.6-इंचाचा फुल एचडी + वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आहे . हा स्मार्ट फोन Android 13 आधारित OneUI 5.1 सह MediaTek Dimensity 1080 octa-core प्रोसेसरवर चालतो. या मोबाईल मध्ये सुद्धा 5,000 mAh बॅटरी देण्यात आली आहे.

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, 48 मेगापिक्सेल प्राइमरी सेन्सर, 8 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 5 मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरा मिळतो. याशिवाय व्हिडिओ कॉल आणि सेल्फी साठी 13-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Samsung Galaxy A34 5G सुद्धा दोन प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. यामधील 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज असलेल्या मोबाईलची किंमत 30,999 रुपये आहे आणि 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 32,999 रुपये आहे. तुम्हाला हे दोन्ही स्मार्टफोन Awesome Lime, Awesome Graphite आणि Awesome Silver या रंगामध्ये खरेदी करता येईल.