Samsung Galaxy F04 : फक्त 7,499 रुपयांत मिळणार Samsung चा ‘हा’ मोबाईल; पहा फीचर्स

Samsung Galaxy F04
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल कंपनी Samsung ने आज भारतीय बाजारात Samsung Galaxy F04 लॉन्च केला आहे. हा कंपनीच्या Galaxy F-सिरीज अंतर्गत एंट्री-लेव्हल स्मार्टफोन आहे. सॅमसंगच्या या मोबाईल ची किंमत अवघी 7,499 रुपये आहे. चला आज आपण जाणून घेऊया या मोबाईलची खास वैशिष्ट्ये..

6.5-इंचाचा डिस्प्ले-

या सॅमसंग (Samsung Galaxy F04) मोबाईलमध्ये (1600 × 720 पिक्सेल) रिझोल्यूशन आणि 60 Hz रिफ्रेश रेटसहसह 6.5-इंचाचा एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले आहे. हा फोन Android 12 वर आधारित One UI 4.1 वर काम करतो. हा स्मार्टफोन MediaTek Helio P35 प्रोसेसरसह येईल. सॅमसंगच्या या मोबाईल ला 5000 mAhची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी USB टाइप-सी पोर्टद्वारे 15W जलद चार्जिंगला सपोर्ट करते. तुम्हाला हा मोबाईल जेड पर्पल आणि ओपल ग्रीन या २ रंगामध्ये मिळू शकतो.

Samsung Galaxy F04

कॅमेरा – (Samsung Galaxy F04)

मोबाईलच्या कॅमेराबाबत बोलायचं झाल्यास, (Samsung Galaxy F04) तर या स्मार्टफोनमध्ये 12-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा आहे. याशिवाय व्हिडिओ कॉल आणि सेल्फी साठी 5-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात 4G, Wi-Fi, Bluetooth v5, GPS, FM रेडिओ आणि USB Type-C पोर्ट आहे.

Samsung Galaxy F04

किंमत किती –

मोबाईलच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, Samsung Galaxy F04 च्या 4GB RAM + 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 7,499 रुपये आहे. हा मोबाईल 12 जानेवारीपासून Flipkart, Samsung.com आणि इतर रिटेलर्सवर सुरू होईल. या मोबाईल वरील सेल ऑफरमध्ये 1,000 रुपयांची त्वरित सूट समाविष्ट आहे. ही सवलत ICICI क्रेडिट कार्ड व्यवहाराद्वारे खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी लागू आहे.

हे पण वाचा : 

Jio Family Recharge Plan : एका Recharge चा फायदा 4 जणांना; 200 GB Data अन् बरंच काही

Nokia C31 : अवघ्या 10 हजार रुपयांत मिळणार Nokia चा जबरदस्त मोबाईल; पहा फीचर्स

Moto X40 लॉन्च; 60 MP सेल्फी कॅमेरा अन् बरंच काही; किंमतही पहा

भारतात Oppo A58x 5G स्मार्टफोन लॉन्च, आता कमी किंमतीत मिळणार जबरदस्त फीचर्स