सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके
मेढा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार हे मतदान प्रक्रियेमध्ये आत जाण्याचा प्रयत्न करतात आहेत. मतदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. सत्ता त्यांची असली तरी त्यांनी कोणत्या भ्रमात राहू नये त्यांनी आत जाऊन हस्तक्षेप केला तर आम्हाला त्यावर आक्षेप घ्यावे लागतील, असा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदीप पवार यांनी दिला आहे.
मेढा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मतदान केंद्र परिसरात सत्ताधारी व विरोधक पॅनेलच्या नेत्यांकडून कार्यकर्त्यांमार्फत मतदानाचा आढावा घेतला जात आहे. दरम्यान, आज मतदान केंद्रावर शेतकरी विकास पॅनलचे उमेदवारांकडून मतदान प्रक्रियेवेळी आत जाण्याचा प्रयत्न केला असता त्यावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदीप पवार यांनी आक्षेप घेतला. त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधत थेट इशाराच दिला आहे.
मतदानावेळी हस्तक्षेप केला तर आम्हीही आक्षेप घेऊ ; शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदीप पवार यांचा इशारा pic.twitter.com/J7ynNsdvC4
— santosh gurav (@santosh29590931) April 28, 2023
यावेळी संदीप पवार म्हणाले की, वारंवार पोलीस प्रशासन उमेदवाराला मतदान केंद्र जवळ जाऊ नये असे सांगून देखील उमेदवार मतदाराला मतदान केंद्रात घेऊन जात आहे. त्याच्याप्रमाणे आम्ही जर हस्तक्षेप केला तर निवडणूक प्रक्रियेमध्ये वाद निर्माण होईल. स्थानिक लोकप्रतिनिधी असल्यामुळे सत्तेचा गैरवापर केला जात आहे, असा आरोप पवारांनी केला आहे.