सांगली | जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक कमी होत असला तरी बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी रुग्णसंख्या स्थिर राहिली. चोवीस तासात 1 हजार 274 रुग्ण आढळून आले. तर 35 जणांचा मृत्यू झाला. याशिवाय 1612 जणांनी कोरोनावर मात केली. सांगली महानगरपालिका नवे 159 रुग्ण आढळून आले. तसेच आटपाडी तालुक्यात 51, कडेगाव 121, खानापूर 108, पलूस 69, तासगाव 119, जत 111, कवठेमहांकाळ 26, मिरज 194, शिराळा 119 आणि वाळवा तालुक्यात 197 रुग्ण आढळले.
कोरोना संशयित रुग्णांची मागील चोवीस तासात जिल्ह्यातील 6 हजार 48 रुग्णांची कोरोना चाचणी घेण्यात आली. आरटीपीसीआर चाचण्या 2055 पैकी 583 बाधित तर 3993 अँन्टीजेन चाचणीमध्ये 729 जण बाधित असल्याचे स्पष्ट झाले. दोन्ही चाचण्यामध्ये मिळून 1274 जण पॉझिटिव्ह आढळले. जिल्ह्यातील 35 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सांगली शहर 4, मिरज व, कुपवाड शहर प्रत्येकी 1, वाळवा तालुक्यातील 6, मिरज व जत प्रत्येकी 5, पलूस 3, आटपाडी, कडेगाव, तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यातील प्रत्येकी 2 तर खानापूर आणि शिराळा तालुक्यातील प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. बाधित रुग्णांपैकी 1612 जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले.
महानगरपालिका क्षेत्रात रुग्णवाढ बुधवारी कमी झाली. नव्याने 159 रुग्ण आढळून आले. सांगली शहरात 159 तर मिरज शहरात 38 रुग्ण आढळले. याशिवाय आटपाडी तालुक्यात 51, कडेगाव 121, खानापूर 108, पलूस 69, तासगाव 119, जत 111, कवठेमहांकाळ 26, मिरज 194, शिराळा 119 आणि वाळवा तालुक्यात 197 रुग्ण आढळले. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील 18, सोलापूर 7, कर्नाटक 6, सातारा जिल्ह्यातील 4, पुणे 2 आणि मुंबई येथील एक रुग्ण आढळला. या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे असल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. या सर्वांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनाचे 1 लाख 13 हजार 208 रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी 3 हजार 266 व्यक्तींचा मृत्यू झाला असून 97 हजार 66 जण कोरोनामुक्त रुग्ण आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 12 हजार 876 रुग्ण अॅक्टीव्ह असून त्यापैकी 10 हजार 64 बाधित रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरु आहेत.