सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
सांगलीत कॉंग्रेस की स्वाभिमानी उमेदवारीवरून राजकीय धुलवड सुरू आहे. भाजप उमेदवार जाहीर करून प्रचारालाही लागली आहे. निवडणुकीत जरा रंग भरत आहे. अशा धामधुमीच्या वातावरणात जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने मिळून आज संयुक्तपणे रंगपंचमी निमित्ताने ‘रंग’ उधळले.
सुट्टीच्या दिवशी रविवारी पोलीस मुख्यालयात रंगांची मुक्त उधळण पाहायला मिळाली. रंगपंचमीचा सण सोमवारी असताना एक दिवस ‘ऍडव्हान्स’ रंगोत्सव साजरा करून पोलिस दलाने ‘टेन्शन फ्री’ दिवस घालवला. लोकसभा निवडणुकीचे टशन सुरू झाले आहे. एसपी व कलेक्टर दोघेही तरूण अधिकारी सांगली जिल्ह्याला लाभले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी जिल्हा समजून घेत आहेत.
रंगपंचमीचा मुहूर्त साधून दोघांनी एक उनाड दिवस व्यतीत केला. जिल्हा सरकारी वकील उल्हास चिप्रे, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे, उपाधीक्षक अशोक वीरकर, मिरजेचे उपाधीक्षक संदीप गिल, एलसीबीचे श्रीकांत पिंगळे, संतोष डोके यांच्यासह बंदोबस्तावरील पोलिसही रंगोत्सवात सहभागी झाले. गतवर्षी अशाच पध्दतीने मुख्यालयात रंगाची उधळण करण्यात आली होती. तीच परंपरा यंदा कायम राखली गेली.
इतर महत्वाचे –
मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याने… कोयना धरण प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन ४० व्या दिवशी स्थगित
अखेर बाळू धानोरकरांच्या पाठीवर काँग्रेसचा हात
‘यांच्या’ सोडचिट्टीने काँग्रेसला सांगलीत मोठा धक्का…