एका लाटेने संपूर्ण कुटुंब केलं उद्ध्वस्त! सांगलीचं कुटुंब ओमानच्या समुद्रात बुडालं

family drowned in oman sea
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सांगलीच्या जतमधील एक कुटुंब ओमान देशातील समुद्रात वाहून (family drowned in oman sea) गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हि घटना रविवारी घडली आहे. या घटनेत एकाच कुटुबांतील तिघांचा मृत्यू (family drowned in oman sea) झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे सांगलीत हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेमध्ये (family drowned in oman sea) सांगलीतील शशिकांत म्हणाणे यांच्यासह त्यांची नऊ वर्षांची मुलगी श्रुती आणि सहा वर्षांचा मुलगा श्रेयस यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पत्नीसमोरच नवरा, मुलं बुडाले
गेल्या अनेक वर्षांपासून शशिकांत म्हणाणे हे दुबईत होते. मूळचे जतमधील हे कुटुंब दुबईत वास्तव्यास होतं. एका कंपनीत सेल्स मॅनेजर पदावर शशिकांत काम करत होते. आपल्या कुटुंबासह ते ओमान येथील समुद्रावर (family drowned in oman sea) गेले होते. वर्षा सहलीसाठी कुटुंबसमवेत गेले असता ही दुर्घटना घडली. शशिकांत यांची पत्नी सारिका म्हणाणे यांच्या समोरच ही घटना घडल्यानं त्यांच्यावरही मोठा आघात झाला आहे.

व्हिडीओ व्हायरल
अचानक समुद्राला भरती आल्याने त्यामध्ये दोघे जण वाहून (family drowned in oman sea) गेल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ओमानच्या सालाह अल मुघसैल समुद्र किनाऱ्यावर (family drowned in oman sea) लाटांच्या तडाख्यात आठ भारतीय समुद्रात पडले. सुरक्षा रेषेच्या पुढे गेलेल्यांना समुद्राच्या लाटेने आपल्याकडे ओढून घेतले. यापैकी तिघांना वाचवण्यात यश आले आहे तर बाकी लोकांचा शोध सुरु आहे.

हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!

येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर

सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक

2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!

संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?