सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर मनपा क्षेत्रातील हॉटेल तपासणीला सुरवात झाली आहे. अस्वछता दिसल्यास संबंधित हॉटेलवर कारवाई करण्याचा इशारा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिला आहे. रस्त्यावर कचरा टाकल्याप्रकरणी हॉटेल लक्ष्मीच्या चालकाला महापालिकेच्या पथकाने ५० हजाराचा दंड केला.
महापालिका क्षेत्रात अनेक छोट्या मोठ्या हॉटेलमध्ये स्वच्छतेबाबत योग्य ती काळजी घेतली जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. या तक्रारीच्या अनुषंगाने आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशानुसार मनपाचे स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, प्रणिल माने, वैभव कुदळे यांच्या टीमने सांगली शहरातील बसस्थानक परिसरात असणाऱ्या हॉटेलची तपासणी सुरू केली आहे. बुधवारी दिवसभर महापालिकेच्या पथकाने आठ ते दहा हॉटेलची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये हॉटेलमधील स्वच्छता, खाण्यापिण्याचे पदार्थ तसेच अन्नपदार्थ भाज्या याबाबतची स्वच्छता घेतली जाते का? अन्न पदार्थ व्यवस्थित शिजवले जाते का? शिळे अन्न काय केले जाते, हॉटेलला ग्राहकांसाठी हात धुण्याची सोय आहे का? या सर्व गोष्टीची तपासणी या पथकाकडून केली जात आहे.
ही मोहीम तिन्ही शहरात सातत्याने सुरू राहणार असून ज्या हॉटेलमध्ये अनियमितता अस्वच्छता दिसेल तिथे कारवाई केली जाणार आहे. या कारवाईबाबत आयुक्त नितीन कापडणीस म्हणाले की, करोना साथीच्या पार्श्वभूमीवर मनपाकडून खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत. प्रत्येक हॉटेलमध्ये नियमानुसार स्वच्छतेची काळजी घेतली जात नसल्याचे दिसून आले तर त्या हॉटेलवर कडक कारवाई केली जाणार आहे.
ताज्या घडामोडींसाठी आम्हाला या 8080944419 नंबरला Hello News असा मेसेज करा
या बातम्याही वाचा –
वर्गशिक्षिकेने आपल्याच विद्यार्थ्यासोबत काढला घरातून पळ; पोलिसांत तक्रार दाखल
लिंग परिवर्तनानंतर पोलीस कॉन्स्टेबलने केलं मुलीशी लग्न; म्हणाला आता सुखानं जीवन जगू शकेल..
महिला जिल्हाधिकाऱ्याने भाजप नेत्याच्या कानशीलात लगावली; पहा व्हिडीओ
धक्कादायक! घटस्फोट देत नाही म्हणुन डॉक्टर पतीने आजारी पत्नीच्या शरीरात सोडले एचआयव्ही चे विषाणू
मालिकेत न्यूड सीन दिल्यानं ‘या’ टीव्ही अॅक्ट्रेसचा तुटला होता साखरपुडा