सांगलीत बाहेरहून आलेल्यांची संख्या पोहोचली १३ हजारांवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशभर लॉकडाऊन जारी आहे. लॉकडाऊनमुळे सांगली जिल्ह्यातील अनेक व्यक्ती राज्याबाहेर व राज्यातील अन्य जिल्ह्यात अडकून पडल्या आहेत. तसेच सांगली जिल्ह्यातही अन्य जिल्ह्यातील व राज्याबाहेरील व्यक्ती अडकून पडल्या आहेत. या व्यक्तींना त्यांच्या स्वगृही जाता यावे यासाठी शासनाच्यावतीने अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत.

त्यानूसार दिनांक १३ मे पर्यंत सांगली जिल्ह्यातून राज्याबाहेर व अन्य जिल्ह्यात ३९ हजार ३४३ व्यक्ती जिल्ह्याबाहेर गेले असून सांगली जिल्ह्यात राज्याबाहेरून व राज्यातील अन्य जिल्ह्यातून १२ हजार ७९६ व्यक्ती जिल्ह्यात आले आहेत. अशा येणाऱ्या व जाणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या ५२ हजार १३९ इतकी आहे. अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी दिली आहे.

यामध्ये सांगली जिल्ह्यातून राज्याबाहेर जाणाऱ्या १७ हजार ९६८ व्यक्ती आहेत तर राज्यातील अन्य जिल्ह्यात जाणाऱ्या २१ हजार ३७५ व्यक्तींचा आहेत. सांगली जिल्ह्यात राज्याबाहेरून आलेल्या ४ हजार ४५९ तर राज्यातील अन्य जिल्ह्यातून आलेल्या ८ हजार ३३७ व्यक्तींचा समावेश आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”