धक्कादायक! सांगलीत दहा वर्षीय मुलाला कोरोनाची लागण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

साळसिंगे येथील कोरोना बाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या कडेगाव तालुक्यातील भिकवडी खुर्द येथील एका दहा वर्षाच्या मुलाचा कोरोना रिपोर्ट आज पहाटे पॉझिटिव्ह आला आहे. सांगली जिल्ह्याला साळसिंगे कनेक्शन पडले महागात पडले असून कडेगाव तालुक्यात कोरोनाची एंट्री झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. तर अन्य तिघांचे रिपोर्ट मात्र निगेटिव्ह आले आहेत. सद्यस्थितीत सांगली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या १४ वर गेली आहे.

अहमदाबाद येथून खानापूर तालुक्यातील साळसिंगे येथे आलेल्या महिलेसोबत भिकवडी खुर्द येथील पती-पत्नी व त्यांची दोन मुले अशी चौघेजण सोमवारी भिकवडी खुर्द येथे आली होती. त्यामुळे त्यांना त्याचवेळी आरोग्य विभागाने तात्काळ होम क्वारंनटाईन केले होते. तर साळसिंगे येथील महिलेला कोरोना झाल्याचे रविवारी निष्पन्न झाले.

त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रांताधिकारी डॉ.गणेश मरकड, तहसीलदार डॉ.शैलजा पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक वायदंडे यांचेसह आरोग्य विभाग व तालुका प्रशासनाने भिकवडी खुर्द येथे धाव घेवून साळसिंगे येथील कोरोना बाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या भिकवडी खुर्द येथील पती पत्नी व त्यांची दोन मुले असे एकूण चौघांना सोमवारी होम क्वारेनटाईनमधून संस्थात्मक क्वारंनटाईन केले. त्यांना कडेगाव येथील शासकीय वसतिगृहातील अलगीकरण कक्षात ठेवले आहे. तर आरोग्य विभागाने त्यांच्या घशातील स्वाबचे नमुने बुधवारी सकाळी घेतले होते. तर या चौघांच्या संपर्कात आलेल्या गावांतील अन्य चौदा जणांना आरोग्य विभागाने होम क्वारंनटाईन केले होते.

तसेच अहमदाबाद येथून भिकवडी खुर्द येथे आलेल्या या चौघांचा कोरोनाचा रिपोर्ट आज पहाटे सहा वाजता आला. त्यामध्ये एका दहा वर्षाच्या मुलाचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर अन्य तिघांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रांताधिकारी डॉ.गणेश मरकड, तहसीलदार डॉ. शैलजा पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक वायदंडे,निरीक्षक विपीन हसबनिस यांचेसह आरोग्य विभाग व तालुका प्रशासनाने भिकवडी खुर्द येथे धाव घेवून संबंधित वस्ती व भिकवडी खुर्द हे गाव सील केली असून गावांत पोलीस बंदोबस्त वाढवला.

आरोग्य विभागाने घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी मोहीम सुरु केली आहे. तर ग्रामपंचायतीच्यावतीने गावात निर्जंतुक औषध फवारणी सुरु केली आहे. गावात प्रचंड भीतीचे वातावरण आहे.14 जण होम क्वारंनटाईन मधून संस्थात्मक क्वारंनटाईन भिकवडी खुर्द येथील दहा वर्षाच्या कोरोना बाधित मुलाला पुढील उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात आज हलविण्यात आले. तर गावातील होम क्वारंनटाईन केलेल्या 14 जणांना आरोग्य विभागाने आज संस्थात्मक क्वारंनटाईन केले असून त्यांना कडेगाव येथील शासकीय वसतिगृहातील अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून आज त्यांच्या घशातील स्वाबचे नमुने घेतले जाणार आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”