सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
सांगली जिल्ह्यात मागील २४ तासात ६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. कडेगाव तालुक्यातील सोहोली येथील मुंबईस्थित पंचवीस वर्षीय गरोदर महिलेचा पती व सासरे या दोघांना कोरोनाची लागण झाली. शिराळा तालुक्यातील रेड येथील मुंबईहून आलेल्या महिलेच्या पतीस कोरोनाची लागण झाली आहे. आटपाडी तालुक्यात मुंबईतून आलेले गोंदीरा येथील ६० वर्षीय पुरुष तर पिंपरी बुद्रुकमध्ये तीस वर्षीय तरुणाला तसेच मिरज भारत नगर हाडको कॉलनीतील ३० वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुखे यांनी सांगितले. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 62 झाली असली तरी सद्यस्थितीत 23 रुग्ण मिरजेत उपचार घेेत आहेत.
शिराळा तालुक्यात मुंबईहून आलेल्या पाच जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाग्रस्त महिला आपल्या पती व दोन मुलासह मुंबईहुन 17 मे रोजी रेड येथे आली होती. त्यावेळी त्यांना जिल्हापरिषद शाळेत क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना जिल्हापरिषद शाळेत क्वारंटाइन करण्यात आले होते.
सोमवारी त्या पती पत्नीला ताप आल्याने व घशात दुखत असल्याने मिरज येथे पाठवण्यात आले होते. त्यांची कोरोनाची चाचणी केली असता सादर महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. पतीचा अहवाल बुधवारी आला आहे. त्यांच्या दोन मुलांचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याने त्यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे.
बाधित दाम्पत्याची मुले शिराळ्यात क्वारंटाइन त्या पती पत्नीला ताप आल्याने दोन मुलांसह मिरज येथे नेण्यात आले होते. मुलांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना शिराळा येथे संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवले जाणार आहे. निगडीच्या दोघांना, अंत्री खुर्दच्या एकास व रेडच्या दोघांना अशी मुंबईहून आलेल्या पाच जणांना कोरोनाची लागण झाली आहे. निगडी मुंबईहून आलेली युवती व तिच्या चुलतीचा उपचारा नंतर अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरोनाची लागण झाल्याची संख्या सात झाली आहे. त्या पैकी निगडीच्या त्या दोघी कोरोनामुक्त झाल्या आहेत. अंत्री येथील पाच जणांचे व रेड येथील तीन जणांचे असे एकूण आठ जणांचे स्कॅबचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. कडेगाव तालुक्यातील सोहोलीत मुंबईस्थित पंचवीस वर्षीय गरोदर महिलेस कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यापाठोपाठ आता त्या महिलेच्या संपर्कातील आणखी दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या संपर्कातील चौघेजण मूळगावी सोहोली येथे रविवारी रोजी रात्री दाखल झाले होते. आरोग्य विभागाने त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून पती, सासू, सासरे आणि भावजय यांना कडेगाव संस्थात्मक विलगीकरणात दाखल केले होते. यापैकी पती आणि सासर्याचा कोरोना चाचणी अहवालही पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी दिली आहे.
आटपाडी तालुक्यातील दोघांना कोरोना आटपाडी तालुक्यातील गोंदी रा येथे मुंबईहून आलेल्या 60 वर्षीय इसम संशयित असल्याने त्याची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याशिवाय तालुक्यातील पिंपरी बुद्रुक येथे मुंबईमधून आलेला तीस वर्षीय तरुणही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. दरम्यान आटपाडी तालुक्यात दोन दिवसात तीन रुग्ण आढळले आहेत त्यामुळे पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. मिरजेत पुन्हा रुग्ण आढळला मिरज शहरातील होळी कट्टा येथील एक महिला बुधवारी कोरोनामुक्त झाली असताना त्याच दिवशी भारत नगर हडको कॉलनी मधील तीस वर्षे महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. या महिलेच्या संपर्कातील लोकांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. उपचाराखालील 23 रुग्णांपैकी आज आणखी 4 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने उपचाराखालील रुग्णांची संख्या आता २३ झाली आहे