सांगली जिल्ह्यात तब्बल 61 नवीन कोरोनाग्रस्त : कामेरीतील एकाचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

बाधितांचा नऊशेचा आकडा पारफोटो – वापरणे.सांगली प प्रतिनिधीकोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना शुक्रवारी वाळवा तालुक्यातील कामेरी येथील 58 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या बळींची संख्या 26 झाली. जिल्ह्यात नव्याने तब्बल 61 रुग्णांची नोंद झाली असून 13 जण कोरोनामुक्त झाले. बाधित रुग्णांचा नऊशेचा आकडाही पार झाला. महानगरपालिका क्षेत्रात 34 रुग्ण आढळले असून सांगलीमध्ये 23 तर मिरजेतील 11 रुग्णांचा समावेश आहे. जत तालुक्यात नऊ, वाळवा तालुक्यात पाच, आटपाडी तालुक्यात तीन, मिरज तालुक्यात सहा, पलूसमधील बांबवडे, शिराळ्यातील गवळेवाडी, आटपाडीतील निंबवडे, कडेगावमधील मोहिते वडगाव, तासगावमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला. जिल्ह्यात आत्तापर्यंत 902 रुग्ण आढळले असून सद्यस्थितीत 443 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

जिल्ह्याच्या विविध भागात गेल्या काही दिवंसापासून रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याशिवाय जुलैला सुरुवात झाल्यापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या गतीने वाढत आहे. रुग्णांची संख्या वाढली असताना मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. शुक्रवारी नव्याने 61 रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे कोरोनाची धास्ती निर्माण झाली आहे. वाळवा तालुक्यातील कामेरी येथील 58 वर्षीय पुरुषामध्ये कोरोनाची लक्षणे असल्याने त्या व्यक्तीला उपचारासाठी दाखल केले होते. त्याची तपासणी केली असता पॉझिटिव्ह आला होता. त्याच्यावर उपचार सुरु असताना शुक्रवारी मृत्यू झाला. वाळवा तालुक्यात पाच रुग्ण बाधित असल्याचे स्पष्ट झाले. कामेरीत दोन रुग्ण आढळले आहेत. पेठ, आष्टा आणि साखराळेमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला. त्यामुळे जिल्हयातील कोरोनाच्या बळींची संख्या 26 झाली.

महापालिका क्षेत्रात 34 रुग्णमनपा क्षेत्रात 34 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यामध्ये सांगलीत 23 रुग्ण सापडले असून काळी वाट परिसरात 14 कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. याचबरोबर मंगलमूर्ती कॉलनीतील होलसेल भाजी विक्रेत्यालासुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. याचबरोबर खणभाग, लाळगे गल्ली, अभयनगर, गणेशनगर, अरिहंत कॉलनी या ठिकाणीसुद्धा कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. मिरजेतसुद्धा कोरोनाचे अकरा रुग्ण सापडले असून या पार्श्वभूमीवर आयुक्त नितीन कापडणीस यांनी परिसरांना भेटी देत कंटेन्मेंट झोनबाबतच्या सूचना प्रशासनाला केल्या. सांगली काळी वाट परिसरात 14 रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आयुक्त कापडणीस यांनी तातडीने त्या ठिकाणी भेट देत आरोग्य विषयक सूचना केल्या.

जत तालुक्यात 9 रुग्ण आढळून आले. जत शहरात पाच, उमदीत दोन, कोंत्येंबोबलाद आणि गुलगुंजनाळ येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला. आटपाडी तालुक्यातील निंबवडेत एक, कडेगाव तालुक्यातील मोहिते वडगावमध्ये एक, मिरज तालुक्यातील कवलापूरमध्ये दोन, बिसूर, अंकली, गुंडेवाडी आणि मालगावमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला. पलूस तालुक्यातील बांबवडेत एक, शिराळ्यातील गवळेवाडीत एक, तासगाव शहरात एक रुग्ण आढळून आला. या रुग्णामध्ये कोरोनाची लक्षणे असल्याने त्यांची तपासणी केली असता सर्व जण पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले.

जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 902

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 902 रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी सव्वीस व्यक्तींचा मृत्यू झाला असून 433 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 443 कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Leave a Comment