अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन नानावटी रुग्णालयात दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनलाही नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिच्यासोबत तिच्या मुलीला अर्थात आराध्या बच्चनलाही नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ऐश्वर्याला ताप आला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून तिला आणि तिच्या मुलीला म्हणजेच आराध्यालाही नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दोन दिवसांपूर्वीच या दोघींचीही कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. एएनआयने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

महानायक अमिताभ बच्चन यांना १२ जुलैच्या रात्री नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांनी त्यांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती ट्विट करुन दिली होती. त्यांचा मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चनलाही नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं अभिषेकनेही त्याची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती ट्विट करुन दिली होती. आता त्यानंतर पाच दिवसांनी म्हणजेच आज काही वेळापूर्वीच अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक ऐश्वर्याची मुलगी आराध्या या दोघींनाही नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या दोघींची करोना टेस्टही १३ जुलै रोजी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर या दोघी होम क्वारंटाइन होत्या. मात्र आज ऐश्वर्याला ताप आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून या दोघींनाही नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.