सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
सांगली शहरातील महसूल कॉलनीमध्ये मुंबईतून बेकायदेशीरपणे आलेली एक व्यक्ती कोेरोना पॉझिटिव्ह असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. जत तालुक्यातील अंकलेमध्येही मुंबईहून आलेल्या एका चाळीसवर्षीय व्यक्तीचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. दोघेही मुंबईहून सांगलीत बेकायदेशीरपणे आले असल्याची माहिती समोर येत आहे.
सांगलीतील महसूल कॉलनीमध्ये ५ मे रोजी रात्री मुंबईहून ‘तो’ तरुण घरी आला होता, पण पूर्वीपासूनच त्याचे घरच्यांसोबत वाद होते, यामुळे तरुण व त्याच्या भावामध्ये त्याला घरी घेण्यावरुन जोरदार वादावादी झाली. यावेळी त्या भावाने पोलिसांना पाचारण करुन हा तरुण बेकायदेशीरपणे मुंबईहून आल्याचे सांगितले होतेे. त्यानंतर पोलिसांनी त्याला सक्तीने क्वॉरंटाईन केले होते. त्याचा स्वॅब घेण्यात आला होता. तो पॉझिटिव्ह आला आहे त्यामुळे आता त्या कुटुंबियांसह अनेकांना क्वॉरंटाईन करण्यात आले असून बापट मळा परिसर सील करण्यात आला आहे. सायंकाळी उशिरा या ठिकाणी औषध फवारणीची प्रक्रिया सुरु होती.
सदर कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या कुटुंबियांना व नातेवाईकांना आरोग्य पथकाने संस्था क्वॉरंटाईन केले असून त्यांचे स्वॅब घेण्यात येणार आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीतील आठ कोरोना रुग्णांपैकी निगडीतील दोघी कोरोनामुक्त झाल्या होत्या , मात्र त्याचदिवशी पुन्हा दोन रुग्ण आढळल्याने कोरोनाग्रस्तांची आठ संख्या कायम राहिली. दरम्यान सांगलीतील बाधिताचे दहाजणांचे कुटुंबिय व इतर संपर्कातील आलेल्या ३४ जणांचे क्वारंटाईन करण्यात आले आहे.
”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”