जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रोटरी क्लब कराड तर्फे स्वच्छता अभियान

0
87
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रोटरी क्लब कराड तर्फे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधी परिसर आणि प्रितीसंगम घाट नदी स्वच्छता अभियान राबविण्यात आले होते. कराड नगर परिषद कराड, रोटरी क्लब ऑफ कराड आणि एन्व्हायरो फ्रेंड्स नेचर क्लब, इनरव्हील क्लब कराड यांनी संयुक्त उपक्रम राबविण्यात आला.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दि. 5 जून सकाळी 7 वाजता कोयना व कृष्णा प्रितीसंगम घाटावरील नदी स्वच्छता व स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा समाधी परिसर स्वच्छ करण्यात आला. यावेळी या जागतिक पर्यावरण दिनाचे थीम “ओन्ली वन अर्थ ” याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पर्यावरणाचा समतोल कचरा निर्मूलन करण्यासाठीच्या वेगवेगळ्या संकल्पना राबून प्रत्येकाने आपली ही जबाबदारी आहे असे समजून पर्यावरणचा समतोल राखण्यासाठी शपथ घेण्यात आली.

यावेळी एन्व्हायरो फ्रेंड्स क्लबचे अध्यक्ष जालिंदर काशीद, कराड नगरपरिषदचे पदाधिकारी व कर्मचारी व रोटरी क्लब कराडचे चंद्रकुमार डांगे, प्रबोध पुरोहित, गजानन माने, राजू खलीपे , राजेंद्र कुंडले, अभिजीत चापेकर, अभय पवार, रामचंद्र लाखोले, शिवराज माने, राहुल कुलकर्णी, आनंदराव थोरात, प्रवीण परमार, रमेश गोखले, इनरव्हील क्लब ऑफ कराडच्या अध्यक्ष मंजुषा इंगळे, सचिव ऋता चाफेकर यांच्यासह सदस्य उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here