हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) लोकसभेसाठी अद्याप अंतिम जागावाटप झालेले नाही, त्यापूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) यांची उमेदवारी घोषित केली. मात्र ठाकरेंच्या या घोषणेनंतरमहाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे. कारण अमोल कीर्तिकर यांच्या उमेदवारीवरुन काँग्रेस नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी उघड नाराजी करत उद्धव ठाकरेंसह (Uddhav Thackeray) अमोल कीर्तिकर यांच्यावर निशाणा साधलाय. तसेच या जागेबाबत काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाने हस्तक्षेप करावा अशी विनंती सुद्धा संजय निरुपम यांनी केली आहे.
संजय निरूपम यांनी ट्विट करत म्हंटल, काल संध्याकाळी उरलेल्या शिवसेना प्रमुखांनी अंधेरी मध्ये उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून महविकास आघाडीचे उमेदवार घोषित केला. रात्रीपासून फोन येत आहेत. हे असं कसे होऊ शकते? महाविकास आघाडीच्या दोन डझन बैठका होऊनही जागावाटपाचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. प्रलंबित असलेल्या ८-९ जागांपैकी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ हा एक आहे असे मला जागावाटप बैठकीमध्ये सहभागी झालेल्या काँग्रेसच्या सहकाऱ्यांनी सांगितले आहे. मग शिवसेनेचा उमेदवार जाहीर करणे हे युती धर्माचे उल्लंघन नाही का? की काँग्रेसला नामोहरम करण्यासाठी असे कृत्य जाणीवपूर्वक केले जात आहे? असा सवाल संजय निरूपम यांनी केला आहे. याबाबत काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाने हस्तक्षेप करावा अशी विनंती सुद्धा संजय निरुपम यांनी केली .
कल शाम बची-खुची शिवसेना के प्रमुख ने अँधेरी में उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्र से #MVA का उम्मीदवार घोषित कर दिया।रात से ही फ़ोन आ रहे हैं।ऐसा कैसे हो सकता है?#MVA की दो दर्जन मीटिंग होने के बावजूद अभी तक सीट शेयरिंग पर अंतिम निर्णय नहीं हुआ है।
— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) March 10, 2024
जो 8-9 सीटें पेंडिंग हैं,उनमें यह…
आपल्या ट्विट मध्ये संजय निरुपम यांनी कीर्तिकर यांच्यावरही निशाणा साधला. शिवसेनेने कोणाचे नाव सुचवले आहे? तो खिचडी घोटाळ्यातील घोटाळेबाज असून त्याने खिचडी पुरवठादाराकडून चेकने लाच घेतली आहे. काय आहे खिचडी घोटाळा? कोविडच्या काळात, BMC द्वारे जबरदस्तीने स्थलांतरित मजुरांना मोफत अन्न पुरवण्याचा एक स्तुत्य कार्यक्रम होता. शिवसेनेच्या प्रस्तावित उमेदवाराने गरिबांना जेवण देण्याच्या योजनेतून कमिशन घेतले आहे असा थेट आरोप निरुपम यांनी केला. तसेच सध्या ED या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे. काँग्रेस आणि शिवसेनेचे कार्यकर्ते अशा घोटाळेबाज उमेदवाराचा प्रचार करतील का? असा माझा दोन्ही पक्षांच्या नेतृत्वाला प्रश्न आहे असं म्हणत संजय निरुपम यांनी उघडपणे आपलॆ नाराजी व्यक्त केली.