सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना पोहरादेवीत गर्दी जमवल्याप्रकरणी संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्यावर कारवाई होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे कोरोना प्रतिबंधासाठी घालून देण्यात आलेले निर्बंध झुगारुन गर्दी जमवली होती असा त्यांच्यावर आरोप होत आहे. अशावेळी राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी संजय राठोड यांनी गर्दी जमवली नसल्याचे सांगत त्यांना क्लीन चिट दिली आहे.
पोहरादेवी येथे संजय राठोड यांच्या स्वागताला आलेल्या १० हजार लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्यानंतर राठोड व महंत यांच्यावर गुन्हा का दाखल करण्यात आला नाही असा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यावर देसाई बोलत होते. ते म्हणाले, ”संजय राठोड यांनी गर्दी केली नाही ते त्यांच्या धार्मिक स्थळांच्या दर्शनासाठी गेले होते. आम्ही याबाबत चौकशी केली त्यानंतरच गुन्हा दाखल केला आहे. त्याठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे उल्लंघन झाल्याचे स्थानिक प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतरच गुन्हे दाखल करण्यात आल्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी सांगितले.
दरम्यान, पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण आणि कालचे पोहोरदेवतील संजय राठोड यांचे शक्तिप्रदर्शन ज्या याबाबत शरद पवार समाधानी नाहीत. संजय राठोड प्रकरणी शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती अंतर्गत सूत्रांकडून मिळत आहे. यावर देसाई यांना विचारले असता, संजय राठोड यांच्यावर मुख्यमंत्री किंवा शरद पवार नाराज असल्याचं मी वाचलं किंवा ऐकलं नसल्याचं शंभूराजे देसाई यांनी सांगितले
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.