हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते आणि राज्याचे परीवहन मंत्री अनिल परब याना ईडीची नोटीस आल्यांनतर भाजप आणि शिवसेनेतील वाद आणखी विकोपाला गेला आहे. याप्रकरणावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. ईडीने त्यांचा एक ऑफिसर भाजप कार्यालयात ठेवला आहे अशी टीका राऊतांनी केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते
गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते हे सातत्याने अनिल परब यांचे नाव घेत आहेत. आता याना कसे कळलं कि आता अनिल परब याना नोटीस येणार असा सवाल संजय राऊतांनी केला. नोटीसा पाठवायला काही हरकत नाही. कायदेशीर लढाईला आम्ही देखील कायद्याने उत्तर देऊ, अनिल परब त्यासाठी समर्थ आहेत असेही संजय राऊत यांनी म्हंटल
अशा नोटिसांमुळे सरकार किंवा शिवसेना कमजोर होईल, वाकेल, सरकारला तडे जातील आणि जे टपून बसलेले आहेत त्यांचा फायदा होईल असे काहीही होणार नाही कारण असे अनेक घाव आम्ही पचवलेले आहेत त्यामुळे तुम्ही आमची चिंता करू नका असे राऊतांनी म्हंटल.