हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नासारख्या गंभीर मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. या दरम्यान नुकतीच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली. दोघांच्यामध्ये काहीवेळ चर्चाही झाली. या मुद्यांवरून संजय रूट यांनी निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी अगदी सहज बोलले, अहमदाबादमध्ये त्यांच्यात चर्चा झाली. हा प्रश्न एवढ्या हलक्यात घेण्यासारखा आहे का? हे तर श्राद्ध उरकल्यासारखं झाले? असा सवाल राऊत यांनी केला आहे.
दिल्लीत संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद असधला. यावेळी ते म्हणाले की, दोन मुख्यमंत्री सीमाप्रश्नासारख्या गंभीर मुद्द्यावर रस्त्यात बोलतात. जाता-जाता, सहज भेटतात आणि बोलतात. महाराष्ट्राच्या अस्मितेचा हा प्रश्न आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांनी माफीचं पत्र लिहिलं ते जनतेला नव्हे तर त्यांच्या राजकीय बॉसला लिहले आहे.
पहाटेचा शपथविधी झाला तेव्हा राज्यपाल आणि गृहमंत्रालयाचा संपर्क जास्त होता. राष्ट्रपतींचे एजंट असले तरी ते गृहमंत्रालयाला अधीन आहेत. त्यामुळे राज्यपालांच्या नियुक्त्यांसदर्भात गृहमंत्रालय असतं. त्यामुळे त्यांनी घटनात्मक प्रमुखाला पत्र लिहिण्यापेक्षा राजकीय बॉसला पत्र लिहिलेले दिसत आहे.