हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माझी मान कापली तरी मी गुवाहाटीचा मार्ग स्विकारणार नाही… या.. मला अटक करा! जय महाराष्ट्र! असे ट्विट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. आज सकाळीच संजय राऊत यांना पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणी ईडीने समन्स बजावले आहेत.
मला आताचा समजले ED ने मला समन्स पाठवले आहे.छान.महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत .. मला रोखण्यासाठी.. हे कारस्थान सुरू आहे.माझी मान कापली तरी मी गुवाहाटी चा मार्ग स्विकारणार नाही… या.. मला अटक करा! जय महाराष्ट्र! असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना टॅग केलं आहे.
मला आताचा समजले ED ने मला समन्स पाठवले आहे.छान.महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोतमला रोखण्यासाठी..हे कारस्थान सुरू आहे.माझी मान कापली तरी मी गुहातीचा मार्ग स्विकारणार नाही.या..मला अटक करा!
जय महाराष्ट्र!@Dev_Fadnavis pic.twitter.com/jA1QcvzP7a— Sanjay Raut (@rautsanjay61) June 27, 2022
दरम्यान, यापूर्वी देखील संजय राऊत यांची तब्बल 11 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. आता महाराष्ट्रात राजकीय हालचाली वाढत असतानाच संजय राऊत यांना ईडी चे समन्स आल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसापासून राज्यात उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्यात सत्तासंघर्ष पाहायला मिळत आहे. संजय राऊत सातत्याने शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारची बाजू जोरदार पणे लावून धरत असतात. आता खुद्द त्यांनाच ईडीचे समन्स आल्याने महाविकास आघाडी साठी हा मोठा धक्का मानला जात आहे.