हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडिओ मॉर्फ करुन सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्यांनतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं होत. पोलिसांनी याप्रकरणी एका कार्यकर्त्याला ताब्यात घेतल आहे. या संपूर्ण घटनेमागे शीतल म्हात्रे यांनी ठाकरे गटावर आरोप केला होता. त्यावर खासदार संजय राऊत यांना विचारलं असता आमचा याच्याशी काहीही संबंध नाही असं उत्तर देत जर ‘तो’ Video खरा असेल तर सार्वजनिक कार्यक्रमात अशा प्रकारे अश्लील वर्तन करून समाजात वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केल्यामुळे यांच्यावरच गुन्हे दाखल व्हायला हवेत अशी मागणी त्यांनी दिली.
प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरणी महाविकास आघाडीच्या कोणत्याही कार्यकर्त्याचा संबंध नाही. तुमची पाप लपवण्यासाठी तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांवरती हात टाकणार असाल तर ते काही कायद्याचे राज्य नाही. मुळात सार्वजनिक कार्यक्रमात अशा प्रकारचं अश्लील वर्तन जर कोणी करत असेल तर त्यांच्यावरच गुन्हे दाखल व्हायला हवेत. हे जे व्हिडिओ आहेत ते खरे आहेत कि खोटे याचा तपास लावा. जर ते विडिओ खरे असतील तर सार्वजनिक कार्यक्रमात अशा प्रकारे अश्लील वर्तन करून समाजात वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केल्यामुळे यांच्यावरच गुन्हे दाखल व्हायला हवेत असं रोखठोक मत संजय राऊत यांनी मांडलं.
राहुल कुल यांच्यावर 500 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप; संजय राऊतांचे फडणवीसांना पत्र
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/6z1QwKfBVo#Hellomahaarashtra @rautsanjay61
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) March 13, 2023
दरम्यान, भीमा सहकारी साखर कारखान्यामध्ये जवळपास 500 ते 550 कोटींचा गैरव्यवहार झाला आहे. याप्रकरणी मी आज गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 2000 पानांचे पुरावे देणार आहे. आम्हाला मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा नाही पण फडणवीसांकडून अपेक्षा आहेत, त्यामुळे त्यांनी या प्रकरणात लक्ष्य घालावे. हे प्रकरण हे फडणवीसांची एकप्रकारे परीक्षा आहे. भाजप नेत्यांच्या भ्रष्टाचाराची अजून 18 प्रकरणे मी फडणवीसांकडे देणार आहे असेही संजय राऊत यांनी म्हंटल.