हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जोगेश्वरीतील भूखंड प्रकरणी शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar Clean Cheat) यांच्यावर सर्व गुन्हे मुंबई पोलिसांनी मागे घेतल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. आता फक्त दाऊदला क्लीन चीट द्यायची बाकी आहे असं म्हणत राऊतांनी प्रहार केला. यांचं लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांच्यावर ईडी सीबीआयचे खटले दाखल केले होते, किरीट सोमय्या यांनी आता यावर बोलावं असं आव्हान संजय राऊतांनी दिले. आज प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.
संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, आता केवळ दाऊद इब्राहिमला क्लीन चीट द्यायची बाकी असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. ओवाळून टाकलेल्या सर्व भ्रष्ट्राचारी लोकांना सरकार आपल्याकडे घेतेय आणि आमची ताकद किती आहे ते दाखवत आहे. खरं तर यांचं लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांच्यावर ईडी सीबीआयचे खटले दाखल केले होते. रवींद्र वायकर तर घाबरून पळून गेले. आता त्यांना क्लीन चिट दिली. याचा अर्थ आहे आहे कि तुम्ही आमच्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल केले, त्यांना भीती दाखवली आणि पक्षात घेतलं. आमच्यासारखी लोक अशा धमक्यांना घाबरले नाहीत पण ज्यांचे काळीज उंदराचे आहे ते पळून गेले असं म्हणत संजय राऊतांनी रवींद्र वायकर यांच्यावर हल्लाबोल केला. स्वता मुख्यमंत्री पळून गेले, त्यांच्याबरोबर आमदार पळाले, अजित पवार पळून गेले. वायकरही त्यातलेच गेले. आम्ही यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले हे भाजपने मान्य केलं पाहिजे असं संजय राऊत म्हणाले.
यावेळी संजय राऊतांनी किरीट सोमय्यां यांच्यावरही हल्लाबोल केला. किरीट सोमय्या हा फडतूस माणूस आहे. वायकर यांच्यावरील गुन्हे ज्याप्रकारे मागे घेण्यात आले आहेत त्याव र सोमय्यांनी बोलावं असं आव्हान संजय राऊतांनी दिले. जे कोणी खऱ्या बापाचे असतील किंवा सत्यवचनी असतील त्यांनी या वाशिंग मशीनवर बोलावं, वायकरसारख्या लोकांवरील खटले कसे मागे घेतले जात आहेत त्यावर बोलावं असं आव्हान संजय राऊतांनी दिले. रवींद्र वायकर यांच्यावर चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करायला हवा. त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हायला हवी. एका आमदारावर एफआयर दाखल करता, ईडीकडे पाठवता आणि नंतर गुन्हे रद्द करता..असं संजय राऊत यांनी म्हंटल.