मुंबई प्रतिनिधी । २०१९ विधानसभा निवडणुकीचा निकाल भल्या भल्यांची झोप उडवणारा ठरला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाने अनपेक्षित मुसंडी मारत युतीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. वरळीतील निकालानंतर संजय राऊत यांनी युती आता फिफ्टी फिफ्टी तत्वावर चालणार असल्याचं सांगत सेनेकडे किमान अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद राहील अशी सूचना केली आहे.
ऐन वेळी राजकारण पालटवण्यात माहीर असलेल्या शरद पवार यांची आज दीड वाजता पत्रकार परिषद होणार असून या पत्रकार परिषदेत ते शिवसेनेला पाठिंबा जाहीर करणार का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे. भाजपला पूर्ण बहुमत मिळणार नसल्याने शिवसेनेला सोबत घेण्याशिवाय आणि सन्मानाने मुख्यमंत्रीपद देण्याशिवाय भाजपकडे पर्याय नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा द्यायचं ठरल्यास शिवसेना आणि राष्ट्रवादी, दोघेही मुख्यमंत्रीपदाबाबत वाटाघाटी करू शकतात. एकूण काय – वाटाघाटी कशाही होऊ देत शिवसेना मुख्यमंत्रीपदावर आपला हक्क सांगणार एवढं मात्र नक्की..!!