शिवसेना आणि शिरोमणी अकाली दल नसलेल्या आघाडीला मी ‘एनडीए’ मानत नाही – संजय राऊत

0
59
sanjay raut
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिरोमणी अकाली दलाने भाजपाची साथ सोडत एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने भाजपाला मोठा धक्का बसला आहे. त्याच पार्श्वभूमीवर, आज शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपासह एनडीए आघाडीवर निशाणा साधला आहे. ज्या आघाडीत शिवसेना आणि अकाली दल नाही मी त्याला ‘एनडीए’ मानत नाही, असं त्यांनी सांगितलं आहे.

“शिवसेना व अकाली दल हे ‘एनडीए’चे मजबूत स्तंभ होते. शिवसेनेला मजबुरीने ‘एनडीए’च्या बाहेर पडावे लागले. आता अकाली दल बाहेर पडला आहे. एनडीएला आता नवे सहकारी मिळाले आहेत, मी त्यांना शुभेच्छा देतो. ज्या आघाडीत शिवसेना आणि अकाली दल नाही मी त्याला ‘एनडीए’ मानत नाही.” असं शिवसेना नेते खासदार संजय राऊत म्हणाले आहेत.

शिरोमणी अकाली दल हा पक्ष मागील २२ वर्षांपासून एनडीए सोबत होता. मोदी सरकारने नुकत्याच मंजुरी दिलेल्या कृषी विधेयकाला विरोध करत त्यांनी एनडीए मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

यापूर्वी कृषि क्षेत्राशी संबधित तीन विधेयकांना विरोध करत शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. ही विधेयके मांडण्याच्या आधी शिरोमणी अकाली दलचे नेते सुखबीर सिंग बादल यांनी त्यांच्या राजीनाम्याची घोषणा केली. त्यानंतर हरसिमरत कौर बादल यांनीही ट्विट करून आपण शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here