हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | यंदाची बिहारची निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे. आज बिहारच्या निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यासाठी मतदान होत आहे, मात्र प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ही आपली शेवटची निवडणूक असल्याचं जाहीर करत माझ्या पक्षाला विजयी करा असं भावनिक आवाहन बिहारी जनतेला जाहीर सभेतून केलं होतं, नितीश कुमारांच्या या वक्तव्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी चिमटा काढला आहे.
याबाबत शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, नितीश कुमार हे खूप मोठे नेते आहेत, त्यांनी आपला डाव खेळला आहे. जर कोणी नेता म्हणत असेल ही माझी शेवटची निवडणूक आहे तर त्यांना सन्मानाने निरोप द्यायला हवा. बिहारची जनताही नितीश कुमारांना निरोप देण्याच्या संधीची वाट पाहत होती, या निवडणुकीत जनता नितीश कुमार यांना निवृत्त करेल असा टोला राऊतांनी लगावला आहे.
#WATCH | नीतीश जी बहुत बड़े नेता हैं। वो अपनी पारी खेल चुके हैं। अगर कोई नेता कहता है कि ये मेरा आखिरी चुनाव है तो उन्हें सम्मान के साथ विदाई देनी चाहिए। बिहार की जनता इस विदाई के मौके का इंतज़ार कर रही थी। इस चुनाव में जनता उनको रिटायर कर देगी: शिवसेना नेता संजय राउत pic.twitter.com/Ju2puHzSY7
— ANI_HindiNews (@AHindinews) November 7, 2020
ही माझी शेवटची निवडणूक आहे. त्यामुळे माझ्या पक्षाला विजयी करा. ज्याचा शेवट गोड, ते सगळंच गोड, असं नितीश कुमार म्हणाले होते, तसेच.’आज निवडणुकीचा शेवटचा दिवस आहे. मतदान आहे आणि ही माझी शेवटची निवडणूक आहे, आमच्या उमेदवाराला विजयी कराल ना, असा प्रश्नदेखील नितीश कुमारांनी जनतेला विचारला होता.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’