मुंबई प्रतिनिधी। एकीकडे मुख्यमंत्र्यांनी आपला राजीनामा देत पत्रकार परिषदतेच्या माध्यमातून शिवसेनेवर हल्लाबोल केला. तर दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत हे शरद पवार यांच्या भेट घेण्यासाठी गेले होते. या दोघांमध्ये जवळपास एक तासभर चर्चा झाली.
या भेटीनंतर संजय राऊत यांनी माध्यमांना सामोरे जात असताना पवार आणि मी फडणवीस यांची पत्रकार परिषद एकत्र पाहिल्याचे सांगितले. फडणवीस यांनी शिवसेनेला धारेवर धरत आमच्या वरिष्ठ नेत्यांवर शिवसेनेने खालच्या पातळीची टीका केल्याचा आरोप केले. त्यावर संजय राऊत यांनी शिवसेना नेहमीच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा सन्मान करत आली आहे मग ते अमित शहा असो किंवा पंतप्रधान मोदी असो असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. मात्र, पवार भेटीत काय चर्चा झाली यांबाबत गुप्तता ठेवत अजूनही आम्ही सरकार स्थापन करू शकतो असा दावा केला.