हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बेळगाव सोडा, मुंबईही कर्नाटकचा भाग आहे, असं कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी म्हणाले होते. त्यावर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सवदी यांच्यावर टीका केली. कर्नाटकचा प्रश्न हा केवळ कर्नाटकचा नसून, हा दोन राज्यांमधील सीमा प्रश्न आहे. हे कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना कळालं पाहिजे. पण असे येडे बरळतच असतात, कुणी तिकडं काही बरळलं तरी इकडं आम्हाला फरक पडत नाही. काल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जे सागंतिलं तेच योग्य आहे. त्यामुळे कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी थोडा इतिहास समजून घेतला पाहिजे अस संजय राऊत म्हणाले.
मुंबई, महाराष्ट्रात जे आमचे कानडी बांधव राहतात, आम्ही कोणतीही सक्ती केली नाही. त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे. त्यांच्या शाळाही इथे आम्ही चालवतो. त्यांच्या संस्थाही महाराष्ट्रात चालतता. तशी परिस्थिती बेळगावमध्ये आहे का? बेळगावमध्ये मराठीचं काय स्थान आहे? असे सवाल करतानाच कानडी लोकांना आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर जायला सांगत नाही. आम्ही फक्त कर्नाटक व्याप्त भाग महाराष्ट्रात यावा असं सांगत आहोत. कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी एकदा महाराष्ट्रात यावं आणि इथल्या कानडी लोकांशी बोलावं, असंही राऊत म्हणाले.
कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी एकदा मुंबईत, महाराष्ट्रात यावं आणि त्यांच्या कानडी बांधवांशी चर्चा करावी. इथं ते उद्योग क्षेत्र, हॉटेल क्षेत्रात जे कामं करतात, हे सर्वजण आमचेच आहेत. उद्या त्यांच जर मतदान घेतलं इथं, तर ते देखील सांगतील की बेळगाव महाराष्ट्रातचं आलं पाहिजे.” असं देखील राऊत यांनी यावेळी बोलून दाखवलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’