हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतरत्न लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनावेळी बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानने दुवा पढली. त्यावरून काही लोकांनी शाहरुख खानवर टीका केली. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत याना विचारलं असता त्यांनी टीका करणार्यांना खडेबोल सुनावले आहेत. शाहरुख खानला ट्रॉल करणे म्हणजे नालायकपणा आहे असे ते म्हणाले
संजय राऊत म्हणाले, ज्या पद्धतीने शाहरुख खानला ट्रोल केलं जात आहे ते चुकीचं आहे. शाहरुख दुवा मागत होता. एका परिवारातील, गटातील लोक त्यांना ट्रोल करत आहेत. हा काय प्रकार आहे, हा नालायक आणि बेशरमपणा आहे. एका महान कलाकाराला ट्रोल करत आहात. धर्म जात पंथ द्वेष यापलिकडे तुम्हाला काही सूचत नाही? असा संतप्त सवाल त्यांनी केला
नेमकं काय घडलं
लतादीदींच्या अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी शाहरुख खान गेला होता. त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलेल्या मंचावर शाहरुख त्याची मॅनेजर पूजा ददलानीसोबत गेला. पुजाने हात जोडून तर शाहरुखने दुवाँ मागून लतादीदींना शेवटचा निरोप दिला. मात्र हा फोटो नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला ज्यामध्ये शाहरुख लतादीदींच्या पार्थिवावर थुंकल्याचा दावा काहींनी केला. अर्थात या दाव्यामुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला. अनेकांनी शाहरुखवर टीका केली.