हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काल विधानसभेच्या विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषण केले. यावेळी त्यांनी माझ्यासोबत आलेला एकही आमदार पडणार नाही. प्रत्येक आमदार निवडून येईल. तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्ही 200 जागा जिंकून आणू, असे म्हंटले. त्यांच्या या भाषण वरून आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांना चिमटा काढला आहे. 200 जागा जिंकण्याची भाषा ही त्यांची नाही. ही तर दिल्लीची भाषा आहे. उलट आम्हीच आता 100 जागा निवडून आणणार असल्याचे राऊत यांनी म्हंटले आहे.
संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधत ते म्हणाले की, लोकांमध्ये सद्या प्रचंड चीड आहे. खदखद आहे. शिवसैनिक इरेला पेटला आहे. त्यामुळे आता निवडणुका झाल्या तर आम्ही 100 हून अधिक जागा नक्कीच जिंकू. तसेच उद्धव ठाकरे यांनीही हिंमत असेल तर मध्यावधी निवडणुका घ्या, असं आव्हान केलं आहे. त्यामुळे हे आव्हान आता नव्या सरकारने स्वीकारावे.
ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. इतरांची नाही. पक्षाच्या जोरावर कुणाला हायजॅक करू शकत नाही. ममता बॅनर्जी म्हणाल्या केवळ पैसे मिळाले नाही, आणखी काही मिळाले. त्या आणखी काहीमध्ये आणखी गोष्टी आहेत, असे राऊत यांनी म्हंटले.
उद्धव ठाकरे काय म्हणाले ?
उद्धव ठाकरे यांनी काल जिल्हाध्यक्षांची बैठकीत थेट भाजप व शिंदे यांना आव्हान दिले होते. “हिंमत असेल तर मध्यावधी निवडणुका घ्याव्यात, आम्हीही तयार आहोत. आता निवडणुका झाल्यातर 100हून अधिक जागा जिंकून आणू. कारण आम्ही असली आहोत, असेही ते म्हणाले होते.