हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नरेंद्र मोदी यांचा भाजप अल्प मतात आला व दोन कुबड्यांच्या मदतीने मोदी पंतप्रधान झाले. मुंबईसह देशात किमान 60 ते 70 ठिकाणी अनेक प्रकारचे तांत्रिक घोटाळे करून भाजपने विजय मिळवले. तसे झाले नसते तर भाजप 110 ते 120 पर्यंतच थांबला असता व मोदी पंतप्रधान झाले नसते. या सगळ्याला निवडणूक आयोग जबाबदार आहे,” असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामनातील रोखठोक सदरातून केला आहे. कुंपणानेच शेत गिळले या मथळ्याखाली ससंजय राऊत यांनी भाजपसह निवडणूक आयोगावरही निशाणा साधला.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
2024 च्या निवडणुकीत भारताच्या निवडणूक आयोगाचे वर्तन सरळ पक्षपाती होते. भाजपची घोडदौड 110 ते 120 वरच थांबणार होती. आयोगाच्या पक्षपातामुळे 240 चा आकडा गाठता आला. धनुष्यबाण, घड्याळ ही चिन्हे गोठवायलाच हवी होती, पण फुटिरांना ही चिन्हे देण्याचे काम आयोगाने केले. मशाल, तुतारी वाजवणाऱ्या माणसालाही आव्हान उभे करण्याचा प्रयत्न झाला. कुंपणानेच शेत खाल्ले असेच हे घडले. पैसा, गुन्हेगारी आणि घोटाळे या तीन भयानक चक्रातून भारतीय निवडणुका बाहेर याव्यात, असे प्रत्येकाला वाटत असते. ते यावेळीही घडू शकले नाही, असे दुर्दैवाने म्हणावेसे वाटते,” असा टोलाही राऊतांनी लगावला आहे.
नरेंद्र मोदी यांचा भाजप अल्प मतात आला व दोन कुबड्यांच्या मदतीने मोदी पंतप्रधान झाले. मुंबईसह देशात किमान 60 ते 70 ठिकाणी अनेक प्रकारचे तांत्रिक घोटाळे करून भाजपने विजय मिळवले. तसे झाले नसते तर भाजप 110 ते 120 पर्यंतच थांबला असता व मोदी पंतप्रधान झाले नसते. या सगळ्याला निवडणूक आयोग जबाबदार आहे, असा थेट आरोप संजय राऊतांनी निवडणूक आयोगावर केला.
“मुंबईतील (उत्तर पश्चिम) मतदारसंघात शिवसेनेचे अमोल कीर्तिकर हे विजयी झाले. मात्र शेवटच्या दोन फेऱ्यांत साधारण सातशे मतांवर दरोडा टाकला व पोस्टल मतांच्या फेरमोजणीचे नाटक करून फक्त 48 मतांनी शिंदे गटाचे वायकर यांना विजयी घोषित करण्याचा पराक्रम या क्षेत्रातील निवडणूक अधिकाऱ्यांनी केला. संपूर्ण देशात हे प्रकरण गाजते आहे व देशाचा निवडणूक आयोग तोंडावर बोट ठेवून नेहमीप्रमाणे मौन बाळगून बसला आहे. देशभरातील निकाल पाहता 500 ते 1000 मतांच्या फरकाने भाजपने 130 च्या आसपास जागा जिंकल्या. या विजयावर संशय आहे. कमी फरकाने जिंकलेल्या जागांवर मतमोजणीच्या शेवटच्या फेऱ्यांत घोटाळे झाले व अशा जागांवर अमित शहांचे विशेष लक्ष होते. ज्या जागा काठावर आहेत त्या अशा पद्धतीने खेचून आणायच्या योजना जणू आधीच ठरल्या होत्या. 500-1000 चे मताधिक्य लोकसभेत नगण्य आहे. म्हणजे भाजप केवळ 110 जागांवरच जिंकला आहे असा दावा संजय राऊतांनी केला.