50 खोकेवाले आमदार हैराण; शिंदेंकडे 2 हजारांच्या नोटा बदलून मागत आहेत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रातील मोदी सरकारने देशात पुन्हा एकदा नोटबंदी केली असून २००० रुपयांची भेट चलनातून बाद करण्यात आली आहे. बँकेत २००० रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी ३० सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे. याच दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर गंभीर आरोप केला आहे. शिंदे गटाचे आमदार हैराण झाले असून ते शिंदे यांच्याकडे 2 हजारांच्या नोटा बदलून मागत आहेत असा दावा त्यांनी केला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, २००० रुपयांच्या नोटा बाद झाल्याने शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी ज्या आमदारांना 50 खोके दिले, ते आमदार आता हैराण झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे हे आमदार 2 हजारांच्या नोटा बदलून मागत आहेत असं खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे. राऊतांच्या या दाव्याने खळबळ उडाली आहे. ब्लॅकचा पैसा हा सध्याच्या महाराष्ट्रातल्या सरकारकडे आणि भाजपाकडे आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

यावेळी संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला. मोदींनी केलेली पहिली नोटबंदी फसली. त्यावेळी ते म्हणाले होते, पहिली नोटबंदी फसली तर मला भरचौकात जाहीर फाशी द्या. आता फासाचा दोर आम्ही तुम्हाला पाठवायचा का?, याचे उत्तर नरेंद्र मोदींनी द्यावे अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.