भाजपने रामाच्या मंदिराचे राजकारण बंद करावे; अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनानंतर संजय राऊतांची टीका

0
60
Sanjay Raut Ayodhya
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन भाजप आणि शिवसेनेत जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. दरम्यान युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी अयोध्या दौरा जाहीर केला असून 15 जून रोजी आदित्य ठाकरे अयोध्येला जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत, गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे, युवासेना सचिव वरुण सरदेसाई आज अयोध्येत दाखल झाले. त्यांनी प्रभू रामचंद्राचे दर्शन घेतले. यावेळी भाजपने रामाच्या मंदिराचे राजकारण बंद करावे, अशी टीका राऊत यांनी केली.

अयोध्येत दाखल झाल्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, कोरोनामुळे मागील दोन वर्षात आम्ही अयोध्येला येऊ शकलो नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर येणार होते. आता आदित्य ठाकरे येत आहेत. हा राजकीय नाही तर धार्मिक दौरा आहे. कार्यक्रम जंगी होणार, शरयू नदीवर महाआरती होणार आहे. मधील काळात काही लोकांनी येथील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कितीही त्यांनी प्रयत्न केला तरी येथील लोकांचे ठाकरे कुटूंब व मुख्यमंत्र्यांवर प्रेम आहे. आदित्य ठाकरेंच्या स्वागतासाठी शिवसैनिक नाही तर येथील जनताही उत्सुक आहे.

मंदिराचे राजकारण आता संपवावे. आता या याठिकाणी फक्त श्रद्धा व अध्यात्म याचाच वास असावा, असा तिला यावेळी संजय राऊत यांनी लगावला. ज्या जागेवर मंदिर उभे राहिले आहे. त्यासाठी हजारोंच्या दिले आहे. त्यामुळे आपण त्या जागेशी भावनिकदृष्ट्या जोडले गेलेलो आहोत. दरम्यान संजय राऊत व एकनाथ शिंदे यांनी अयोध्येत ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामाचे मंदिर निर्माण कार्य सुरू आहे तेथे भेट दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here