Satara News : अजित पवार गटाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी संजीवराजे नाईक- निंबाळकर

Sanjeev Raje Naik-Nimbalkar News
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलेल्या अजितदादा पवारांकडून राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजितदादा पवार गटाच्या जिल्हाध्यक्षपदी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांची आज निवड करण्यात आली आहे.

दरम्यान, आज करण्यात आलेल्या संजीवराजेंच्या निवडीनंतर फलटण शहरात तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. तब्बल ३० वर्षांपासून जिल्ह्याच्या राजकारणामध्ये संजीवराजे नाईक निंबाळकर सक्रिय आहेत. त्यांनी यापूर्वी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष, पंचायत समिती सभापती यासोबतच अनेक पदांवर आपला ठसा उमटवलेला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यासह विविध मान्यवरांनी संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे अभिनंदन केले.

आतापर्यंत भूषविली ‘इतकी’ पदे

सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. हा बालेकिल्ला उभारण्यात फलटणकरांनी जिल्हावासीयांच्या सहकार्याने पक्षश्रेष्ठीच्या मार्गदर्शनाखाली महत्वाची भूमिका बजावली आहे. फलटण तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या सतत संपर्कात राहुन त्यांच्या प्रश्नांची मांडणी करुन ते सोडविण्यासाठी प्रयत्नशील असलेले संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी आजपर्यंत पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदावर काम केले आहे. संजीवराजे नाईक-निंबाळकरांच्या राजकीय कारकीर्दीची सुरूवात फलटण नगरपालिका निवडणुकीपासून झाली. संजीवराजे २०१७ ला झेडपी अध्यक्ष झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून फलटण तालुक्यात ग्रामपंचायती पासून ते विधानसभेपर्यंत एक हाती सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे ठेवण्याचे काम संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे. संजीवराजे नाईक-निंबाळकरांच्या राजकीय कारकीर्दीची सुरूवात फलटण नगरपालिका निवडणुकीपासून झाली. नगरपालिकेत सत्ता स्थापन केल्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत संजीवराजे हे बरड जिल्हा गटातून निवडणू आले. त्याचवेळेस पंचायत समितीचे सभापदीपदही त्यांनी भूषविले. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सलग सहा वेळा ते निवडून आले आहेत. यापूर्वी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पदही त्यांनी भूषविले आहे.