दारूच्या नशेत “सांताक्लॉजची भररस्त्यात तुफान हाणामारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – ख्रिसमस हा जगातील सर्वाधिक लोकप्रिय सणांपैकी एक आहे. याची सर्वजण आतुरतेने वाट बघत असतात. सध्या ख्रिसमसच्या निमित्ताने जगभरात उत्साह, चैतन्याचे वातावरण आहे. बाजरपेठा सजल्या आहेत. या सणाच्या दिवशी शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सुट्ट्या दिल्या जातात. या सणाच्या दिवशी लहान मुलं गिफ्ट देणाऱ्या सांताक्लॉजची (santa clause) आतुरतेने वाट पाहात असतात.

सध्या सांताक्लॉजचा (santa clause) असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे तो पाहून तुम्हाला धक्का बसेल. सांताक्लॉज चक्क भर रस्त्यात हाणामारी करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ @ViciousVideos या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही लोकांनी सांताक्लॉजचा (santa clause) गेटअप केलाय. अन् ते रस्त्यावर एकमेकांशी भांडणं करताना दिसत आहेत.

https://twitter.com/ViciousVideos/status/1606229376655400960

या सांताक्लॉजनी (santa clause) दारूच्या नशेत ही हाणामारी केली आहे. हि संपूर्ण हाणामारीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला असून या व्हिडिओला 22 हजारांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून अनेकांनी त्यावर आपल्या गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

हे पण वाचा :
संजय राऊत होणार भारत जोडो यात्रेत सहभागी; घेणार राहुल गांधींची भेट
सुप्रिया सुळेंकडून शिंदे गटातील आमदाराचे कौतुक; ट्वीट करत म्हणाल्या…
ठाकरे गटाचे आणखी 3 खासदार आणि 8 आमदार शिंदेंच्या संपर्कात, ‘या’ खासदाराचा मोठा दावा
50 आमदारांच्या गुवाहाटी दौऱ्याची तारीख ठरली !; ‘या’ दिवशी जाणार कामाख्या देवीच्या दर्शनाला
भगतसिंग कोश्यारी यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया; म्हणाले…..