संजय राऊत म्हणजे पिसाळलेला कुत्रा; शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांची जीभ घसरली…

Santosh Bangar Sanjay Raut
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “संजय राऊत म्हणजे पिसाळलेला कुत्रा आहे. पिसाळलेल्या राऊतांना आपण ठेचणार आहे. त्यांच्या कानशिलात वाजवल्याशिवाय ते शांत बसणार नाही,” असे विधान शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी केले आहे.

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी आज शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. टीका करताना त्यांची जीभ घसरली असून त्यांनी राऊतांचा थेट कुत्रा असा उल्लेख केला आहे. सध्या संजय राऊत यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिंदे गटाच्या आमदारांवर वारंवार टीका केली जात आहे. यावरून आ. बांगर यांनी राऊतांवर निशाणा साधला

दरम्यान, आता शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी संजय राऊत यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर शिंदेणेकडून नेमकी काय प्रतिक्रिया दिली जाणार हे पहावे लागणार आहे.

संतोष बांगर नेमकं काय म्हणाले?

आमदार संतोष बांगर यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मला वाटतंय संजय राऊत हा पागल झालेला, पिसाळलेला कुत्रा आहे. ते जर आमच्या नेत्यांबद्दल, मुख्यमंत्र्यांबद्दल अशा प्रकारची विधाने करत असतील तर आम्हीही गप्प बसणार नाही संजय राऊत ज्या ठिकाणी भेटतील त्या ठिकाणी त्यांना ठेचल्याशिवाय राहणार नाही.