हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – 21 वर्षांनंतर भारताला मिसेस वर्ल्ड 2022 मिळाली आहे. जम्मू-काश्मीरमधील रहिवासी असलेल्या सरगम कौशलने मिसेस वर्ल्ड 2022 चा किताब पटकावला आहे. या सौंदर्यस्पर्धेचं आयोजन अमिरेकेत करण्यात आलं होतं. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत बॉलिवूडमधल्या मोठमोठ्या कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यात अभिनेत्री सोहा अली खान, विवेक ओबेरॉय, मोहम्मद अझरुद्दीन, कॉउचर डिझायनर मौसमी मेवावाला आणि माजी मिसेस वर्ल्ड आदिती गोवित्रीकर यांचा समावेश होता. हा ‘किताब घेताना सरगम कौशल मंचावर भावूक झाली होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
2001 मध्ये, अभिनेत्री-मॉडेल आदिती गोवित्रीकरने विजेतेपद पटकावले होते. Mrs. World 2022 कार्यक्रम शनिवारी वेस्टगेट लास वेगास रिसॉर्ट आणि कॅसिनो येथे आयोजित करण्यात आला होता. अमेरिकेच्या मिसेस वर्ल्ड शायलिन फोर्ड यांच्या हस्ते सरगम कौशलला Mrs. World 2022 चा मुकुट घालण्यात आला. मिसेस पॉलिनेशियाला फर्स्ट रनर अप घोषित करण्यात आले आणि त्यानंतर मिसेस कॅनडाला सेकंड रनर अप म्हणून घोषित करण्यात आले.
कोण आहे सरगम कौशल?
मिसेस वर्ल्डचा किताब जिंकून जगभरात भारताची मान उंचावणारी सरगम कौशल ही मूळची जम्मू-काश्मीरची आहे. ती शिक्षिका आणि मॉडेल आहे. 2018 मध्ये सरगमचं लग्न झालं. लग्नानंतर तिला सौंदर्यस्पर्धेत भाग घेण्याची फार इच्छा होती.आत्मविश्वास आणि सौंदर्याच्या जोरावर अमेरिकेच्या लाग वेगासमध्ये पोहोचली आणि तिने Mrs. World 2022 हा ‘किताब जिंकून भारताची मान उंचावली. सरगमने याआधी मिसेस इंडिया 2022 चा किताबादेखील जिंकला होता.
हे पण वाचा :
Jio Fiber च्या 699 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 14 OTT Apps चे फायदे
Smartphones मधील मागचा कॅमेरा नेहमी डाव्या बाजूलाच का असतो???
PNB च्या खातेधारकांनी लवकरात लवकर पूर्ण करा ‘हे’ काम
RBL Bank च्या ‘या’ क्रेडिट कार्डवरील प्रत्येक ट्रान्सझॅक्शनवर मिळवा 1% कॅशबॅक
मुलांसाठी बचत खाते उघडण्याचे फायदे जाणून घ्या