औरंगाबाद प्रतिनिधी । 10 लाख रुपयाचे व्याजासह 50 लाख रुपये फेडून देखील सावकाराकडून त्रास देणे सुरूच असल्याने एका माजी सरपंचाने स्वतःच्या शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी केलेल्या विडिओ मध्ये अनेकांची नावे आहे.ही धक्कादायक घटना खुलताबाद तालुक्यातील आखातवाडा येथे आज पहाटे 6 वाजेच्या सुमारास समोर आली.पोपट उर्फ राधाकृष्ण विठ्ठल बोडखे असे आत्महत्या करणाऱ्या माजी उपसारपंचाचे नाव आहे.ते सरकारी कंत्राटदार होते.
बोडखे हे माजी सरपंच होते.त्याच बरोबर ते शासकीय कंत्राटदार होते.परिसरात त्यांनी अनेक कामाचे गुत्ते घेतले होते. घेतलेल्या कंत्राट पूर्ण करण्यासाठी त्यांना पैशाची आवश्यकता असल्याने त्यांनी ओळखीच्या दोन व्यक्ती कडून वेळोवेळी अशी 10 लाख रुपयांची रक्कम व्याजाने घेतली होती. त्याचा व्याज वेळेवर देऊ न शकल्याने व्याजाची रक्कम वाढतच चालली होती.त्यांनी या कालावधीत दोन्ही सावकारां घेतलेल्या व्याजाच्या 10 लाखाच्या बदल्यात 50 लाख रुपये फेडले मात्र तरी देखील अजून पैशाची मागणी दोन्ही सावकार करीत होते. या त्रासाला ते कंटाळले होते.
दरम्यान, त्यांनी केलेल्या कामाचे बिल देखील लॉकडाऊन मुळे ते आर्थिक अडचणीत आले होते. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून ते नैराश्याच्या गर्तेत होते. आज पहाटे ते घर नसल्याने मुलगा व नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला असता बोडखे यांनी स्वतःच्या शेतात लिंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलयाचे घरच्यांच्या निदर्शनास आले.या प्रकरणी बोडखे यांच्या मुलाच्या फिर्यादीवरून खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
हे पण वाचा –
पायलट बॉयफ्रेंडसोबत भांडण; एअर होस्टेसची फ्लॅटच्या बाल्कनीतून उडी मारून आत्महत्या
ICU मध्ये ऑक्सिजन अभावी रुग्णाचा मृत्यू; मृत्यूपूर्वी केलेल्या ‘या’ व्हिडिओमुळे खळबळ
4 दिवस एका लिफ्टमध्ये अडकून राहील्या ‘या’ मायलेकी; एकमेकींचे URINE पिऊन वाचवला जीव
आता ‘या’ दहा गोष्टींसाठी नाही पडणार बँकेत जाण्याची आवश्यकता, ATM मध्ये मोफत होईल काम
पंतप्रधान-किसान सन्मान निधी योजना: जर तुम्हालाही मिळाले नसतील 6000 रुपये तर करा ‘या’ हेल्पलाईनवर कॉल