सातारा | सातारा जिल्ह्यातील संचारबंदी व जमावबंदी कायम ठेवण्यात आली आहे. निर्बंध काळात वैध कारणाशिवाय किंवा परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. यापुर्वी लग्न समारंभासाठी 25 लाेकांना परवानगी हाेती. ती मर्यादा तशीच ठेवली असली तरी आता लग्नाला येणाऱ्या सर्वांकडे काेविड 19 निगेटीव्ह अहवाल असणे बंधनकारक करण्यात आले आहे. तर अत्यंविधीलाही केवळ 20 लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे. तर कोरोना टेस्ट प्रमाणपत्र सक्तीचे असून आदेशाचे उल्लघंन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
सातारा जिल्ह्यात काेविड बाधितांची संख्या दोन हजारांच्या घरात येत आहे. याबराेबरच म्युकरमायकाेसिस या आाजाराने तीन रुग्णांचा मृत्यू झालेला असून 28 रूग्ण आहेत. काेविड बाधितांची संख्या राेखण्यासाठी प्रशासन वारंवार अनेक उपाययाेजना करीत आहे. तरी देखील रुग्ण संख्या घटत नसल्याचे चित्र आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पुन्हा एकदा जिल्ह्यात एक जूनपर्यंत कडक लाॅकडाउन केला आहे.
आता सातारा जिल्ह्यात लग्नाला यायचे असेल तर तुमची काेविड 19 ची चाचणी निगेटिव्ह असायला हवी. अथवा लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण झालेले पाहिजेत. याचबरोबर लग्न समारंभाच्या ठिकाणी उपस्थित राहणा-या व्यक्तींची कोरोना चाचणी निगेटिव्ह पाहिजे. प्रमाणपत्र नसल्यास किंवा लसीकरण करून घेतलेले नसल्यास संबंधितास प्रत्येक व्यक्तिस एक हजाराचा दंड करण्यात येणार आहे. तसेच सबंधित आस्थापनेला दहा हजाराचा दंड केला जाणार आहे. धार्मिक, प्रार्थना स्थळी विवाह सोहळ्याचे आयोजन करताना नियमांचे पालन करण्याच्या अटीवर परवानगी देण्यात आली आहे.
तसेच अंत्यसंस्कारासाठी २० पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येणेस प्रतिबंध केला आहे. तेथील कर्मचा-यांकडे वैध कोरोना चाचणी निगेटिव्ह प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे असेही आदेशात नमूद केले आहे.