सातारा (Satara News) । जिल्हाधिकारी रचेश जयवंशी यांची अचानक तडकाफडकी शासनाने बदली करण्यात आली आहे. सांगली जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी जितेंद्र दुडी यांची सातारा जिल्हाधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
महाबळेश्वर, पाचगणी, कास, मॅप्रो गार्डन बाबत घेतलेली कडक भूमिका यामुळे जयवंशी चर्चेत होते. पालकमंत्री शंभूराज देसाई यांची नाराजी जयवंशी यांच्या बदलीला कारणीभूत ठरली का अशी सातारा जिल्ह्यामध्ये चर्चा सुरू आहे. आजच जिल्हाधिकारी जयवंशी यांनी महाबळेश्वर येथील अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेतली होती.
सातारकरांच्या प्रत्येक प्रश्नासाठी वेळ देणारा जिल्हाधिकारी म्हणून जयवंशी यांची कारकीर्द लक्षात राहिल. जयवंशी यांनी खूप कमी कालावधीसाठी सातारा जिल्ह्यात काम केले. मात्र आपल्या कार्यकाळात धडाकेबाज कामगिरीमुळे कामाचा वेगळा ठसा उमटवण्यात ते यशस्वी झाले.