व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

कोण शरद पवार? त्यांनी माझ्या मतदार संघात निवडणूक लढवून दाखवावी; केंद्रीयमंत्री मिश्रांचे थेट आव्हान

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी भाजप नेते तथा केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या टीकेला मंत्री मिश्रा यांनी प्रत्युत्तर दिले असून शरद पवारांना मी सुद्धा ओळखत नाही. कोण शरद पवार? 5 ते 6 खासदार असणाऱ्या पक्षाला आम्ही गृहीत धरत नाही. पवारांनी माझ्या मतदार संघात येऊन एकदा स्वतः निवडणूक लढवून दाखवावी, असे थेट आव्हान मंत्री अजयकुमार मिश्रा यांनी दिले आहे.

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा हे आज साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, शरद पवारांना वाटत असेल कि मी एक नेता आहे. आम्ही सुद्धा एका क्षेत्राचे नेते आहोत. शरद पवारांना वाटत असेल तर त्यांनी आमच्या मतदार संघात येऊन निवडणूक लढवून दाखवावी, असे प्रतिआव्हान मिश्रा यांनी केले आहे.

साताऱ्यात भाजपच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री अजयकुमार मिश्रा यांनी थेट खासदार शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. त्यांच्या टीकेला राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून काय प्रत्युत्तर दिले जाणार हे पहावे लागणार आहे.