सातारा भाजपा जिल्हाध्यक्षपदी आ. जयकुमार गोरेंची वर्णी

0
110
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी| सकलेन मुलाणी

भारतीयजनता पार्टीच्या प्रदेश सचिवपदी सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सातारा जिल्हाध्यक्षपदी आ. जयकुमार गोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी याबाबतची घोषणा सोमवारी केली.

आमदार जयकुमार गोरे यांच्या निवडीमुळे माण- खटाव तालुक्याला बहुमान मिळाला. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीचा पार्श्वभूमीवर विक्रम पावसकर यांना जिल्हाध्यक्ष पदावरून पायउतार केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

आगामी निवडणुकांसाठी आ. जयकुमार गोरे यांचा आक्रमक चेहरा भाजपाने जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्त केला आहे. आ. गोरे यांच्यावर मिळालेल्या जबाबदारीला किती यश मिळेल हे निवडणूका नंतर समजणार आहे.

[better-ads type=’banner’ banner=’196069′ ]

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here