सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा जिल्हयात कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीत अधिकच चिंताग्रस्त बनत चालली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. गत 24 तासांत सात रुग्णांची भर पडली आहे. तर जिल्ह्यात एकूण 64 बाधित रुग्ण संख्या झाली आहे.
सातारा जिल्ह्यात 24 तासांमध्ये 122 नागरिकांची काेराेनाची चाचणी करण्यात आली. तसेच 07 नागरिकांना काेराेनाची बाधा झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. एका काेराेनाबाधिताचा मृत्यू झाला आहे तर तीन रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
सातारा जिल्ह्यात एकही लस उपलब्ध नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. तसेच काेराेनाचा वाढता संसर्ग पाहता नागरिक गर्दीच्या ठिकाणी स्वयंस्फुर्तीने मास्क वापरावा असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.