सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कराड कृष्णा मेडिकल कॉलेज येथे बाधित रुग्णाच्या निकट सहवासित २ महिला (वय वर्षे 16 व 37) व क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे मुबंईवरून 17 एप्रिल रोजी आलेला तरुण (वय वर्षे 27) अशा 3 नागरिकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून ते कोरोना बाधित असल्याची माहिती बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
तसेच आज क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील २०, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील ७१, व ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथील ३ अशा एकूण ९४ नागरिकांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे. सातारा जिल्ह्यात 45 रुग्ण कोविड बाधित असून आता पर्यंत 8 (कोविड 19) मुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहेत तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, आज सकाळी वेनुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे ६ आरोग्य कर्मचारी कोरोना बाधित सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. आता पुन्हा २ रुग्ण सापडल्याने एकाच दिवसात कराड तालुक्यात 10 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे स्पष्ट झाले आहे. ताज्या आकडेवारीनुसार, कराड तालुक्यातील तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ४२ झाली आहे तर सातारा जिल्ह्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ५५ वर पोहोचली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”