सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
एकेकाळी संपूर्ण प्रतापसिंहनगर परिसरात राज करणाऱ्या दत्ता जाधवचा मुलगा लल्लन जाधव याने तुरूंगातून बाहेर येताच विक्रम पैलवान या भंगार व्यावसायिकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात विक्रम पैलवान गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
या बाबत सविस्तर माहिती अशी की, शनिवारी रात्री 12 ते 1 च्या दरम्यान प्रतापसिंह नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर दत्ता जाधव यांचा मुलगा जो नुकताच मोक्यातून सुटून बाहेर आला आहे त्याने आणि त्याच्या ६ साथीदारांनी भंगार व्यावसायिक विक्रम पैलवान याच्यावर धारधार शस्त्राने हल्ला चढविला.
हा हल्ला जीवघेणा होता मात्र सुदैवाने यात विक्रम पैलवान बचावला असून गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
काही दिवसांपूर्वीच लल्लन जाधव हा संघटित गुन्हेगारी कायदा मोक्का मधून सुटून बाहेर आला आहे. गेली 3- 4 वर्षे तो कोल्हापूर येथील कळंबा जेल मध्ये आपले वडील दत्ता जाधव यांच्या सोबतच कैद होता. मात्र काही दिवसांपूर्वीच त्याची सुटका करण्यात आली. तो बाहेर येण्याआधीच त्याच्या समर्थक तरुणांकडून त्याचे स्टेटस व्हायरल करण्यात आले होते. यात तो बाहेर आल्यावर काहीतरी मोठं करणार असे स्पष्ट जाणवत होते. गेल्या अनेक वर्षपासून म्हणजे दत्ता व ललन तुरुंगात गेल्या पासून प्रतापसिंह नगर परिसर शांत होता मात्र कालच्या घटनेने पुन्हा या परिसरात अघोषित दहशतिची छाया पसरली आहे. सातारा शहर पोलिसांनी लल्लन जाधव सह आणखी सहा जणांवर गुन्हा नोंद केला आहे
या घटनेनंतर लल्लन व त्याचे साथीदार फरारी झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. संपूर्ण प्रतापसिंह नगर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आला आहे. ठीकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आली आहे. या हल्ल्याचे कारण स्पष्ठ नसले तरी मागील भांडणातून अथवा वर्चस्ववादातून हा हल्ला झाला असावा अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी या संपूर्ण परिसरसतील दत्ता जाधवची दहशत मोडीत जाधत दत्ता जाधव व त्याच्या भावावर मोक्का अंतर्गत कारवाई करत त्यांना तुरुंगात पाठविले होते. सध्याचे अधीक्षक समीर शेख यांच्या समोर आता अश्या लोकांवर कायमची कारवाई करून त्यांना पुन्हा तुरुंगात पाठवणे व प्रतापसिंह नगरात शांतता बहाल करण्याचे आव्हान असणार आहे