सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी आज मतमोजनी होत आहे. अत्यंत चुरशीच्या समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीत महत्त्वाच्या राजकीय नेत्यांचे भवितव्य पणाला लागले आहे. जिल्हा बँकेच्या दहा जागांसाठी अकरा तालुक्यातून अत्यंत चुरशीने 96 टक्के मतदान झाले. आता आजच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या निवडणुकीत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, उदयसिंह पाटील, सत्यजितसिंह पाटणकर, शशिकांत शिंदे, शेखर गोरे, मनोज पोळ, प्रभाकर घार्गे याच्यात महत्त्वाच्या लढती होत आहेत. जिल्ह्यातील १ हजार ९६४ मतदारांनी मतदान केले आहे.
दरम्याम, साताऱ्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री शशिकांत शिंदे यांना पराभवाचा धक्का बसू शकतो अशी चर्चा आहे. शिंदे यांच्या विरोधात उभे असलेल्या ज्ञानदेव रांजणे यांना शिंदेंच्या विरोधकांनी ताकद दिल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे सहकारमंत्री अन् उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्यातील लढत विशेष ठरणार आहे.
सातारा जिल्हा बँक निवडणूक निकाल : Live Updates
8:00 am – मतमोजणीला सुरवात