Satara DCC Bank Result : राष्ट्रवादी आमदार शशिकांत शिंदेंचा अवघ्या 1 मताने पराभव; जावळीतून ज्ञानदेव रांजणे विजयी

सातारा | सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा निकाल हाती आला असून जावळी मतदार संघातून ज्ञानदेव रांजणे हे विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार शशिकांत शिंदे यांचा त्यांनी पराभव केला आहे. ज्ञानदेव रांजणे यांना 25 तर शशिकांत शिंदे यांना 24 मते मिळाली आहेत. अवघ्या एक मताने शिंदे यांचा पराभव झाला आहे.

सातारा जिल्हा बँकेत निवडणुकीसाठी जावजी मतदारसंघ लढत अत्यंत चोरीचे असे झालेली पाहायला मिळाली. मतदानादिवशी ज्ञानदेव रांजणे आणि शशिकांत शिंदे यांच्या गटात बाचाबाची झाली होती. त्या पार्श्वभूमीवर जावळीचे तहसीलदार यांनी आज निकाल आदिवशी 144 कलम तालुक्यात लागू केली आहे.

जावी विकास सेवा सोसायटी चे विजयी उमेदवार ज्ञानदेव रांजणे यांनी मतमोजणीच्या ठिकाणी सातारा येथे सकाळी आठ वाजता हजेरी लावली होती. विजयाची खात्री असल्याने ते स्वतः मतमोजणी केंद्रावर ती उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. ज्ञानदेव रांजणे यांच्या विजयामध्ये सत्ताधारी सहकार पॅनेलचे व राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच या पुढे जाऊ देत शशिकांत शिंदे आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले हे यापुढे आमने-सामने पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सातार्‍यात राडा : शशिकांत शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचं कार्यालय फोडलं

सहकारमंत्र्यांची विजयानंतर हॅलो महाराष्ट्र सोबत बातचीत; काय म्हणाले पहा

गृहराज्यमंत्रांचा पराभव केलेल्या पाटणकरांनी निकाल लागताच दिली ‘हि’ प्रतिक्रिया; म्हणाले…

शशिकांत शिंदें यांचा पराभव केल्यानंतर रांजणे यांचे हॅलो महाराष्ट्रला पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

रामराजे नाईक- निंबाळकर हे सातारा जिल्ह्याला लागलेला कॅन्सर

राष्ट्रवादी कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी सहकार मंत्र्यांनी दिली हि प्रतिक्रिया | Balasaheb Patil

कोण जिंकलं? कोण हरलं? जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सर्व निकाल पहा मतमोजणी केंद्रावरून | निकालाचे विश्लेषण

 

You might also like