Sunday, April 2, 2023

सातारा – कास रस्ता निकृष्ठ : ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन – सचिन मोहिते

- Advertisement -

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा- कास रस्त्यांचे कामकाज निकृष्ट दर्जाचे आहे. सदरची वस्तुस्थिती आम्ही पाहिली असता तेथील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. त्यांची जाणीव आम्ही शिवसेना स्टाईलमध्ये दिलेली आहे. परंतु तरीही ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कारवाई न झाल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा शिवसेना उपजिल्हा प्रमुख सचिन मोहिते यांनी दिला आहे.

- Advertisement -

सचिन मोहिते यांनी आज कार्यकारी अभियंता यांची भेट घेतली त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, सातारा – कास रस्त्यांवर 22 ठिकाणी पॅचेस मारलेले आहेत. काही ठिकाणी रस्ता कमी- जास्त प्रमाणात खचलेला आहे. भर पावसात रस्त्यांचे काम सुरू आहे. कार्यकारी अभियत्यांनी दिशाभूल करणारी माहीती दिली. आम्ही अधिक्षक अभियत्यांना भेटणार आहोत. त्याच्यावर कारवाई न झाल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल.

सातारा- कास मार्गावरून पर्यटकांची मोठी ये-जा सुरू असते. तर कास व बामणोली या पर्यटनास्थळांवर जाणारा हा मार्ग आहे. जिल्ह्याचा नावलाैकिक या पर्यटन स्थळांमुळे सर्वत्र आहे. येथे अनेकजण भेट देतात मात्र या मार्गावरील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. त्यामुळे लवकरात लवकर यांची दखल संबधित विभागांनी घ्यावी, अन्यथा शिवसेना आपल्या स्टाईलने दखल घेण्यास भाग पाडेल असे सचिन मोहिते यांनी सांगितले.