Sunday, May 28, 2023

रुग्णसंख्येत वाढ : सातारा जिल्ह्यात नवे 644 कोरोनाबाधित तर पाॅझिटीव्ह रेट 7.23 टक्के

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

सातारा जिल्ह्यात रविवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये नवे कोरोना 644 पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 330 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये 8 हजार 901 चाचण्या तपासण्यात आल्यानंतर त्यामध्ये पाॅझिटीव्ह रेट 7.23 टक्के इतका आहे.

जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 11 हजार 665 झाली आहे. सातारा जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 2 लाख 20 हजार 328 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 2 लाख 5 हजार 548 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 5 हजार 312 बाधितांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी दिवसभरात 15 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

रविवारी रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये पाॅझिटीव्ह रेट वाढला आहे. सातारा जिल्ह्यात कराड, वाई, सातारा व फलटण शहरात आॅनलाईन बुकींग करून लसीकरण करण्यात येत आहे. मात्र, रुग्ण संख्येत वाढ होता असलेली दिसत आहे. सध्या जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहे.