सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्हा बॅंकेचा अध्यक्षपदी वाई सोसायटी गटातून बिनविरोध झालेले कै. लक्ष्मणराव पाटील (तात्या) यांचे चिरंजीव व आ. मकरंद पाटील यांचे बंधू नितिन काका पाटील याची वर्णी लागलेली आहे. तर उपाध्यक्षपदी औद्योगिक, विणकर, मजूर संस्था, पाणीपुरवठा संस्था मतदारसंघातून बिनविरोध झालेले अनिल देसाई यांची बिनविरोध निवड लागलेली आहे.
आज अध्यक्ष, उपाध्यक्षाच्या निवडी अगोदर जिल्हा बॅंकेत कमराबंद चर्चा झाल्या. यामध्ये सभापती रामराजे नाईक- निंबाळकर, छ. खा. उदयनराजे भोसले, छ. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, संचालक शिवस्वरूपराजे खर्डेकर, माजी आ. प्रभाकर घार्गे, प्रदिप विधाते आदी उपस्थित होते.
सातारा जिल्हा बॅंक : नितिन काका पाटील अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी अनिल देसाई बिनविरोध#hellomaharashtra #sataradcc pic.twitter.com/gkS8ff0wHS
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) December 6, 2021
अध्यक्षपद भाजप कि राष्ट्रवादी यामध्ये कोणाकडे राहणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले होते. अखेर राष्ट्रवादीच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली. तर माण- खटावचे तालुक्यातील अनिल देसाई यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.
आजच्या महत्वाच्या बातम्या :
Gold Price – लग्नसराईच्या हंगामात सोने खरेदी करणार असाल तर आजची किंमत जाणून घ्या
पोस्ट ऑफिसमधील ‘या’ FD मध्ये तुम्हाला मिळेल बँकेपेक्षा जास्त फायदा, याचे रेट्स जाणून घ्या
महाराष्ट्र बनेल Omicron हब? राज्यात आतापर्यंत या व्हेरिएंटची 7 तर देशभरात 12 प्रकरणे
जोतिबाच्या दर्शनाला जाताना दुचाकीचा अपघात : तांबवेतील एक ठार, पत्नी, भाची गंभीर जखमी
देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध फौजदारी आरोप निश्चित; पहा नेमकं काय आहे प्रकरण